बीड प्रतिनिधी : शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देत जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बीड मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. आ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जाफर ईनामदार यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे बीड शहरातील राजकीय समीकरणांना नवे बळ मिळाले असून पक्षाची ताकद अधिक भक्कम झाली आहे, आरेफ नगर भागातील रस्ता नालीसह इतर विकासाचे प्रश्न प्रामुख्याने सोडवल्या जातील कार्यकर्त्यांना सन्मान दिला जाईल अशी ग्वाही यावेळी आ. विजयसिंह पंडित यांनी दिली आहे
मंगळवार दि .२२एप्रिल रोजी हा प्रवेश सोहळा नगरसेवक बिलाल शेख आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम गवते यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी आमेर ईनामदार, रिजवान भाऊ, हमीद भाई, निसार भाई, मुस्तफा भाई, महमुद भाई, महेबुब भाई, कादिर अजहर भाई आणि सलीम भाई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश करत विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नसून तो सर्वसामान्यांचा आवाज आहे. आ. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली बीड शहराच्या प्रगतीसाठी आणि तळागाळातील लोकांपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी मेहनत घेत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इनकमिंग वाढली आहे. य
दरम्यान, पक्षप्रवेशानंतर लगेचच आ. विजयसिंह पंडित यांनी आरेफ अली नगर परिसराची पाहणी करत जनतेशी थेट संवाद साधला. नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांनी रस्ते, नाली, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य देत ती लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. शरातील व नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत विकासकामांना गती देण्याचा निर्धार यावेळी आ. विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केला.या पक्ष प्रवेश कार्यक्रमामुळे बीड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक वाढली आहे.













