लवकरच घेणार बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : आघाडी सरकार मधुन शिंदे गट बाहेर पडल्यानंतर राज्यातील आघाडी सरकार कोसळले होते, यानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अतुल सावे यांच्याकडे देण्यात आले. परंतु आज परत राजकीय भूकंप होत राष्ट्रवादीचा मोठा गट शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील झाला. शपथविधी सोहळा काही तासातच राजभवनावर पार पडला. यात मंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी शपथ घेतली. लवकरच त्यांच्याकडे बीडचे पालकमंत्री पद म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे.