जल जीवन मध्ये मोठी माया जमा केल्याची चर्चा!
तीन ते चार टक्के दर होता म्हणे बिले काढण्यासाठी?
प्रारंभ वृत्तसेवा
बीड ; बीड जिल्ह्यामध्ये लाचखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. गेल्या काही महिन्यापासून ज्या ज्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर कारवाया झाल्या आहैत, यावरून जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे अधिकारी भ्रष्टकारभार सुरु आहे हे लक्षात येते. आज बीड जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता मुकुंद आंधळे व वरिष्ठ लिपिक किरण कुमार हावळे या दोघांना 80 हजाराची लाच घेताना एसीबीने रंग हात पकडले, विशेष म्हणजे हेच कार्यकारी अभियंता जल जीवन मध्ये बिले काढण्यासाठी तीन ते चार टक्क्याने पैसे घेत असल्याची चर्चा ठेकेदारामध्ये होत आहे. यामुळे या लाचखोर अधिकाऱ्याची संपूर्ण संपत्तीची चौकशी व्हावी अशी ही मागणी आता होत आहे.