प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गेल्या दोन दिवसांपूर्वी शिक्षण क्षेत्रामध्ये दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली होती. सदरील दोन्ही आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी शनिवारी (ता, २८) बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाभरात शैक्षणिक बंदही पाळण्यात आला, पालकांनी रस्त्यावर निदर्शने केले जर लवकरात लवकर या दोन्ही आरोपींना अटक केली नाही. तर सोमवारी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. आज सकाळीच स्थानिक गुन्हे शाखेने विजय पवार व प्रशांत खाटोकरला मांजरसुंबा परिसरामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शिवाजी बंटेवाड यांच्या टीमने केली.