• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, April 18, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

बीड जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

Prarambh Team by Prarambh Team
August 15, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

• सर्वांच्या सहकार्याने बीड जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करुन चेहरा-मोहरा बदलणार


• 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बीड-अहिल्यानगर’ रेल्वे सुरु होणार

बीड,  : बीड जिल्ह्याचा कृषी, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक, सांस्कृतिक, उद्योग व क्रीडा आदी क्षेत्रातील सर्वागिंण विकासासाठी राज्य शासन कटिबध्द असून, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणुन याकरीता सर्वत्तोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांच्यासह सर्व कार्यालय प्रमुख, अधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा देत म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना, क्रांतीकारकांना, हौतात्म्य पत्करलेल्या शहिद वीरांना, अभिवादन केले आहे. असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी वचनबद्ध होऊया, सामाजिक जाणीव, राष्ट्रीय कर्तव्य-जबाबदारीच्या भावनेतून राष्ट्रविकासात योगदान देऊया. स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी सर्वात मोठा राष्ट्रीय उत्सव आहे. हा उत्सव तितक्याच उत्साहात, आनंदात, व्यापक स्वरुपात साजरा करायचा आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी आपण दृढसंकल्प करुया की, राष्ट्रविकासात सर्वांना सोबत घेऊन जाताना शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक यांना प्रगतीची योग्य संधी उपलब्ध करून द्यायची आहे. त्यांचे आर्थिक-सामाजिक सक्षमीकरण करायचे आहे. देशाचे स्वातंत्र्य, एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मूल्ये अबाधित राखणे, भारतीय राज्यघटनेवरचा विश्वास अधिक दृढ करणे, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी आजवर सर्वोच्च त्याग केला, अमूल्य योगदान दिले. त्या सर्वांबद्दल आपण कायम कृतज्ञ असले पाहिजे. देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन देशाला समृद्ध, बलशाली देश बनवण्याचा निर्धार करुया.

मराठवाड्याची भूमी ही संतांची, शूर-वीरांची, बुद्धीवंत, कर्तृत्ववानाची भूमी आहे. मराठवाड्याला सहजासहजी काही मिळालं नाही, जे काही मिळालं ते संघर्ष करुनंच मिळाले आहे. देशाला 15 ऑगस्ट, 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, परंतू मराठवाड्याला 17 सप्टेंबर, 1948 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यासाठी सर्वसामान्य जनतेला, निजामाच्या सैन्याशी लढावे लागले. त्या त्यागाचं स्मरण करुन, त्यांना अभिवादन करणे हे आपले कर्तव्य आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे स्वामी रामानंद तीर्थ यांनी नेतृत्वं केले होते. तसेच दिगंबरराव बिंदू, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे यांच्यासारख्या नेत्यांनी त्यांना भक्कम साथ दिली होती. मराठवाडा मुक्तीसंग्रामात प्रत्येक गावातल्या लोकांनी सहभाग घेतला होता, हे या लढ्याचं वैशिष्ट्य होते. आपल्या बीडच्या विठ्ठलराव काटकरांनी निजामाच्या रोहिल्यांना जेरीस आणण्याचं काम केलं होतं.त्यांच्यासोबत काशिनाथ जाधव आणि हिरालाल कोटेचा हे भूमीपूत्र सुध्दा लढ्यात अग्रभागी होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, आजच्या या स्वातंत्र्य दिनी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी, आपणांस विश्वास देतो की, आपल्या सर्वांच्या सहकार्यानं बीड जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करुन चेहरा-मोहरा बदलायाचा आहे. बीड जिल्ह्यासाठी आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर बीड विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला असून, त्यासाठी जागा निश्चिती आणि पूर्वव्यवहार्यता चाचणीसाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच येणाऱ्या 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘बीड-अहिल्यानगर’ रेल्वे सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

जिल्ह्यातील युवकांना तंत्रज्ञानाधारित कौशल्य मिळण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजी आणि एमआयडीसी यांच्या सहकार्याने सुमारे 196.98 कोटी रुपयांचा ‘सीट्रीपलआयटी’ हा प्रकल्प उभारण्यात येणार असून नुकतचे याचे भूमिपुजन झाले आहे. परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सुधारित 351 कोटींची मान्यता देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे बीडमधील श्री कंकालेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात महसूल भवनाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ नुकताच पार पडला आहे. मागील आठवड्यात मी जिल्हा दौऱ्यावर असतांना प्रत्येक विभागातील विकासकामांचा आढावा घेतला आहे. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करण्यात आली. लवकरच याठिकाणी अधिक कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख प्रशासनासाठीच्या सुसज्ज इमारती तयार होणार आहेत. तसेच बीडमध्ये एक भव्य आणि अत्याधुनिक ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहकार भवनाची उभारणीही होणार असून, सहकार क्षेत्रातील सर्व कामकाज एका छताखाली सुलभपणे पार पडण्यास मदत होणार आहे. जिल्हा क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून संकुलातील विविध सुविधांचा विकास आणि विस्तारीकरण करण्यात येणार आहे. खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा, प्रशिक्षणाची साधने आणि उत्कृष्ट पायाभूत व्यवस्था मिळणार आहे.

आपला महाराष्ट्र शेतीप्रधान राज्य असून शेतीच्या बरोबरीनं पशुधनाचा विकासही महत्वाचा आहे. त्यामुळे परळी येथे होणाऱ्या नवीन शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयांमुळे पशुपालकांना अत्याधुनिक, दर्जेदार पशुवैद्यकीय सेवा मिळणार असून, राज्यात प्रशिक्षित पशुवैद्यकांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. राज्यातल्या पशुधनाच्या आरोग्याची काळजी आणि विकासासाठी हे पशुवैद्यकीय महाविद्यालयअत्यंत महत्वाची भूमिका बजावेल, असा त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला. महसूल विभागाने ‘जनता दरबार’, ‘सेवामित्र चॅटबोट’, ‘जिवंत 7/12’ मोहिम, ‘महसूल सप्ताह’, आणि विवादग्रस्त फेरफारांचे तात्काळ निवारण हे उपक्रम सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी राबवलेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या आरोग्य तपासण्या, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणपत्र, ‘कायाकल्प’ पुरस्कार, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणमधील 94 टक्क्यांपेक्षा अधिक उद्दिष्टपूर्ती, ‘लखपती दीदी’ योजना, अंगणवाडी बांधकाम या उपक्रमांनी ग्रामीण जीवनमान उंचावले आहे.

पोलीस विभागाच्या ‘संवाद QR कोड’, ‘सुगम संपर्क’, ‘थर्म नेम प्लेट’, ‘पोली
स आपले बांधावर’ अशा उपक्रमांमुळे नागरिकांचा विश्वास वाढला आहे, तर गंभीर गुन्ह्यांत घट झाली आहे.
हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत एका दिवसात 30 लाख झाडे लावून आपल्या बीड जिल्ह्यानं नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. येणाऱ्या कालावधीत आपल्याला बीड जिल्ह्यात एक कोटी झाडे लावून ती जगवणार आहोत. या हरित चळवळीत प्रत्येक बीडकरांनी आपलं योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.

सहकार विभागाने ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कठोर पावले उचलली असून, सर्वसामान्य जनतेचा पैसा त्यांना परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. तसेच महावितरण विभागाने भविष्यातील विजेची गरज ओळखून सौर कृषी पंप, पारेषण यंत्रणा बळकटीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य क्षेत्रातही आपण मोठी झेप घेत असून, अंबाजोगाई येथील मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये हृदयरोग निदान आणि उपचारासह अनेक असाध्य आणि दुर्धर आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा बीडमध्येच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. जिल्हा रुग्णालयातील 100 बेडचे कार्डीयाक कॅथलॅब, वाढीव खाटांचे रुग्णालय, ‘एमआरआय’, माता-बाल संगोपन रुग्णालय, डायलिसीस सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार असुन, याकरीता निधीची कमतरता पडू देणार नाही. या सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांना उपचारासाठी जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज पडणार नाही. युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली असून, 4 हजाराहून अधिक प्रशिक्षणार्थ्यांना 18 कोटींपेक्षा जास्त विद्यावेतन अदा केले आहे. तसेच जिल्हा उद्योग भवन बांधकामासाठी 32 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाचे स्व:ताच्या हक्काचे घर असावे, हे आमचे ध्येय असल्याचे सांगत, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सन 2024-25 मध्ये सुमारे 98 टक्के आणि सन 2025-26 मध्ये 90 टक्क्यांहून अधिक घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यामुळे हजारो कुटूंबांचे कायमस्वरूपी निवाऱ्याचे स्वप्न साकार झाले आहे. रमाई आवास योजनेतही पाच हजारांहून अधिक घरांना मान्यता देण्यात आली आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ‘लखपती दिदी’ हा उमेद अभियानाचा उपक्रम बीडमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आला असून, राज्याच्या उद्दिष्टापेक्षा चांगली कामगिरी करून आपल्या बीड जिल्ह्यातील बहुसंख्य महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभा करुन आपले उत्पन्न वाढवले आहे.

हे सर्व प्रकल्प आणि उपक्रमही बीडच्या विकासयात्रेची नवी सुरुवात असून. आपण सर्वजण मिळून, लोकशाहीच्या बळावर, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, शेती-उद्योग-शिक्षण-आरोग्य-पर्यावरण या सर्वच क्षेत्रात बीड जिल्ह्याला महाराष्ट्राच्या प्रगत जिल्ह्यांच्या अग्रस्थानी आणुया, असे आवाहन ही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी केले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी स्वातंत्र्य सैनिकांचे गुलाबपुष्प देवून भेट घेत त्यांच्याशी संवादही साधला. घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमास जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, माननीय खासदार-आमदार, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि पत्रकार यांची उपस्थिती होती.

****
वृत्त क्रमांक :- 264 दिनांक:- 15.08.2025

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘रानभाजी महोत्सवा’चे उद्घाटन

बीड, दि.15 (जिमाका) : येथील सामाजिक न्याय भवनाच्या परिसरात कृषी विभागाने पावसाळ्यातील रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजन केले असून, आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात रानभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. यावेळी मा. पालकमंत्री यांनी रानभाजी स्टॉलची पाहणी करुन रानभाज्यांची माहिती घेतली.

येथील सामाजिक न्याय भवनाच्या परिसरात रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. आमदार सर्वश्री संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुभाष साळवे, यांच्यासह सर्व कार्यालयप्रमुख, अधिकारी यांची उपस्थिती होती.

यावेळी उपमुख्यमंत्री यांनी प्रदर्शनातील सर्व स्टॉलला भेट देवून रानभाज्यांची माहिती घेतली. या प्रदर्शनात विविध रानभाज्यांचे प्रदर्शन लावण्यात आले व विक्रीसाठीही रानभाज्या उपलब्ध होत्या. सुरण, टाकळा,पाथरी, भुईआवळी, कपाळफोडी, तरोटा, उंबर, चिगुर, सराटे, घोळ भाजी, केना, शेवगा, कर्टुली इ. रानभाज्यांपासून बनवलेल्या विविध पदार्थांचेही प्रदर्शन, तयार करण्याची पाककृतीही सादर करण्यात आली. या महोत्सवात शेतकरी महिला, बचतगट, शेतकरी गट त्याचप्रमाणे व्यक्तिगत शेतकरीही सहभागी झाले होते.





Previous Post

वैद्यनाथ बँकेवर ना. पंकजाताई मुंडेंचं वर्चस्व कायम

Next Post

जालना जिल्हा विकासात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी कटीबध्द

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
Next Post
जालना जिल्हा विकासात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी कटीबध्द

जालना जिल्हा विकासात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी कटीबध्द

ना. पंकजाताई मुंडे यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ अवाॅर्ड

ना. पंकजाताई मुंडे यांना 'कोहिनूर ऑफ इंडिया' अवाॅर्ड

मस्साजोग प्रकरणात शासन-प्रशासनाने न्याय द्यावा- आ.संदीप क्षीरसागर

मराठा आरक्षणासाठी मोठ्या संख्येने मुंबईला चला - आ.संदीप क्षीरसागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

तारखेनुसार बातमी शोधा !

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा