• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, March 10, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

मुस्लिम बांधवांना विकास आणि संरक्षण दोन्हीही देण्याची जबाबदारी माझी – पंकजाताई मुंडे

Prarambh Team by Prarambh Team
May 2, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

पंकजाताई मुंडे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचा मुस्लिम बांधवांचा निर्धार

दिंद्रुड येथे साधला मनमोकळा संवाद ; तेलगाव येथे मतदारांच्या घेतल्या भेटी

दिंद्रुड/ तेलगाव ।लोकनेते मुंडे साहेबांना मुस्लिम बांधवांनी नेहमीच साथ दिली आहे, तशीच साथ मलाही मिळत आहे. विरोधक भूलथापा मारुन मुस्लिम बांधवांना भाजपच्या विरोधात घाबरवतात पण त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या केसालाही धक्का लागला तर सर्वात अगोदर मी पुढे येईल. काळजी करू नका, तुमचा विकासच तर मी करेनच पण तुमचे संरक्षणही करण्याची जबाबदारी मी घेते असा विश्वास भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी येथे बोलतांना दिला.

पंकजाताई मुंडे यांनी आज दिंद्रुड व तेलगाव येथे मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला. दिंद्रुड येथे ईद ए-मिलाद कार्यक्रमात मुस्लिम बांधवांना त्यांनी मनमोकळा संवाद साधत शुभेच्छा दिल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आ. प्रकाश सोळंके, मोहनराव जगताप, बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ मुंडे, मौलाना फारूक, शेख अखिल, चांदभाई, शिवाजी बडे, नईम शेख आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना पंकजाताई म्हणाल्या, माझ्यावर विश्वास ठेवा, कारण माझ्या नावापुढे गोपीनाथ मुंडेंचे नाव लागले आहे. मी सर्व जाती धर्मावर नेतृत्वाची सावली होईन, त्यामुळे तुमची लेक म्हणून मला मतांची ओटी भरा. माझा विजय म्हणजे तुमचा विजय आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे म्हणून या निवडणूकीत सन्मानाचा विजय मिळवून देण्यासाठी भरघोस मतांनी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा. मी मंत्री असताना केलेला विकास तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिला आहे. माझ्याविषयी कुणाच्या मनात राग लोभ नाही. भविष्याचा विचार करा मला पाच वर्षे द्या. रोजगार, उद्योगासह पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबध्द राहील. सर्वांचा समान विकास करेन. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार विराजमान होणार आहे. अशावेळी या भव्य विजयात आपलाही हिस्सा असावा यासाठी मला संधी द्या. मी कायम विकासासोबत आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे. अल्पसंख्याकांवर अन्याय होत असेल तर मी तुमच्या हक्कासाठी अगोदर पुढे येईल.मी मायनॉरिटी आहे पण काम मेजॉरिटीचे करते असं त्या म्हणाल्या.

विकासासाठी पंकजाताईंना साथ द्या – आ.सोळंके

प्रारंभी आ.प्रकाश सोळंके यांचे भाषण झाले. सत्तेत असताना पंकजाताईनी सर्व गावांना, सर्व जाती-धर्माला विकासाची समान संधी दिली. भेदभाव न करता सर्वांना निधी दिला. बीडचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पंकजाताईंना निवडून देणं गरजेचं आहे असं ते म्हणाले.

पंकजाताईंच्या विजयासाठी हाडाची काडं करू – पोटभरे

बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे म्हणाले, पंकजाताई मुंडेंकडे विकासाचे व्हिजन आहे. त्या लोकनेते मुंडे साहेबांच्या राजकीय वारसदार आहेत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्या विजयासाठी हाडाचे काड करून त्यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देऊ.

तेलगाव येथे भेटीगाठी

पंकजाताई मुंडे यांनी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड, तेलगाव येथे मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला. या ठिकाणी पंकजाताईंच्या आगमनानिमित्त ग्रामस्थांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करत खंबीरपणे पाठीशी राहू असा शब्द दिला.

Previous Post

आक्षेपार्ह पोस्ट, फेकन्युज, अफवा पसरविणा-यांवर करडी नजर

Next Post

गोदावरीचे पाणी सिंदफणेत आणण्यासाठी प्रयत्न करणार

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
गोदावरीचे पाणी सिंदफणेत आणण्यासाठी प्रयत्न करणार

गोदावरीचे पाणी सिंदफणेत आणण्यासाठी प्रयत्न करणार

मी टीका करणार नाही, पण माझ्यावर टीका केल्यास व्याजासह प्रतिउत्तर देऊ – बजरंग सोनवणे

मी टीका करणार नाही, पण माझ्यावर टीका केल्यास व्याजासह प्रतिउत्तर देऊ - बजरंग सोनवणे

शांततापूर्ण निवडणूक होण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे: निवडणूक निरीक्षक अजीमुल हक

शांततापूर्ण निवडणूक होण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे: निवडणूक निरीक्षक अजीमुल हक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा