Beed : जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढवून हा भाग सुजलाम सुफलाम व्हावा आणि शेतकरी राजा सुखी व्हावा. म्हणून गोदावरीचे पाणी सिंदफणेत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आणि इंडिया विकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे बोलताना दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि इंडिया विकास आघाडीचे उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आणि इंडिया विकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे, माजी मंत्री लोकनेते बदामराव आबा पंडित, प्रदेश प्रवक्त्या सुशीला मोराळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या किसान सेलच्या प्रदेशाध्यक्ष पूजाताई मोरे, पंढरीनाथ लगड, अण्णासाहेब राठोड, महेश बेदरे, विक्रम दाभाडे , दिनकर पवार हे गेवराई तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन मतदारांची सुसंवाद साधत आहेत.
बजरंग बप्पा सोनवणे यांनी गेवराई तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी मादळमोही येथील झालेल्या सभेत पालकमंत्र्यांना उद्देशून म्हणाले की, मागील दहा वर्षां पूर्वी देखील तुमच्याच भगिनी खासदार होत्या. मग त्या भाजप सोबत एकनिष्ठ नव्हत्या की काय? म्हणून तुम्ही पंतप्रधानाच्या नजिक गेल्यास विविध योजना आणण्यासाठी मतदान मागत आहात. असे कोपरखळी मारली. आज भाजपच मतासाठी जातीवाद करीत आहे. परंतु खुल्या प्रवर्गानेच मागील पंधरा वर्षा पासून जिल्ह्याचा खासदार म्हणून ओबीसी प्रवर्गाला संधी दिली. तसेच बजरंग बप्पा यांचे कुणबी जातीचे काढलेले प्रमाणपत्र पालक मंत्र्यांनी भर सभेत फडकावून दाखविण्याची आवश्यकता नव्हती. कारण ते सर्व कुणबी मराठा जात प्रमाणपत्र हे ऑनलाईन असल्याने सर्वांना पाहण्यासाठी खुले आहे. राज्याचे कृषिमंत्री म्हणून पालकमंत्री काय काम केलं ? याची माहिती त्यांनी द्यायला हवी. कांदा अनुदान, सन २०२० चा पीकविमा, कापूस, सोयाबीन, तूर व हरबरा या पिकांना भाव नाही. मात्र खासदारांनी संसदेत या बाबत कधीच तोंड उघडले नाही. त्यांना कुणीच संसदेत बोलताना नव्हे तर निवडणुकीत मते मागण्यासाठी आणि जिंकल्या नंतरही कोणत्या गावात गेल्याचे कुणी पाहिलेले नाही. भाजपच्या उमेदवार आणि पालकमंत्री यांचे जलजीवन मिशन आणि रस्त्याच्या काम करणारे ठेकेदार यांच्याशी अर्थपूर्ण सबंध असल्यानेच त्या योजने संबंधी बोलत नाहीत की काय? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच बहुरंगी म्हणणाऱ्या पालक मंत्र्यांना उत्तर देताना कुणाचा बहुरंगीपना उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. असे म्हणून मी रंगात रंग मिसळणार बजरंग आहे. असे म्हणाले.
तसेच पालकमंत्री महोदय हे अशा प्रकारचे वक्तव्य करून ते स्वतःच त्यांच्या उमेदवाराला पराभूत करण्याची त्यांनाच घाई झालेली आहे. असे म्हणाले.
तर मी निवडून आल्यास मराठा, धनगर, मुस्लिम ओबीसी यांचे आरक्षणासाठी मर्यादा वाढविणे. सुशिक्षित बेकरांच्या हाताला काम देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात नवीन प्रकल्प आणून बेकारी दूर करून दरडोई उत्पन्न वाढविणे. संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न करणे याचाही उल्लेख भाषणात केला. तसेच मतदारांच्या. प्रेमामुळे बजरंग सोनवणे भारावून गेले आणि म्हणाले की, तुमचे प्रेम बघून कातड्याचे जोडे केले. तरी मी त्यातून उतराई होवू शकणार नाही. असे भावनिक उदगार काढले.
यावेळी राज्य प्रवक्त्या प्रा. शुशिलाताई मोराले, माजीमंत्री लोकनेते बदामराव आबा पंडित आणि माजी सभापती पंढरीनाथ लगड यांची भाषणे झाली.
या कॉर्नर सभेला मादळमोही आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोण काय म्हणाले?
प्रा. सुशिलाताई मोराळे :- बजरंग बप्पा हे इंडिया विकास आघाडीचे उमेदवार नसून स्वतः शरद पवार साहेब हेच उमेदवार आहेत म्हणून मतदान करा. आणि बजरंग सोनवणे यांना विजयी करा.
*बदामराव आबा पंडित :-* जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात बजरंग सोनवणे यांना मताधिक्य देण्याची शर्यत लागली आहे.
*पंढरीनाथ लगड :-* दर वर्षाला दोन कोटी तरुणांना नोकऱ्या आणि खात्यात पंधरा लाख रू. या मोदी सरकारने लोकांना थापा देवून फसविले. परंतु आता तसल्या थापांना मतदार भुलणार नाही.
नवस आणि मदत सुद्धा !:
गेवराई तालुक्यातील वंजारवाडीचे सरपंच पांडुरंग पवार बजरंग बप्पा यांच्या प्रचारासाठी निधी म्हणून ११ हजार १११ रुपये देणगी दिली. तर मुळूकवाडी येथील बाळू भांडे, बबलू कोकाटे, विठ्ठल धुरंधरे, ज्ञानेश्वर वाघ, सुनिल गिरी यांनी गावच्या यात्रेत गाडे ओढले.