गेवराई ( प्रतिनिधी ) शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून, सकाळी साडेआठ वाजता गेवराई येथे शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी ते सदिच्छा भेट देणार आहेत. याप्रसंगी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक तथा जि प चे माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजीत पंडित यांनी केले आहे.
राज्यात सत्तांतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसची उभी फुटून मोठी राजकीय घडामोड घडल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे दिनांक 17 ऑगस्ट 2023 रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दुपारी त्यांची बीड येथे जाहीर सभा होणार आहे. तत्पूर्वी सकाळी साडेआठ वाजता शरद पवार हे गेवराई विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे नेते तथा शिवसेना राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्वयक तथा बीड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती युधाजित पंडित यांनी केले आहे.