27 ऑगस्ट 2023 ला बीड येथील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी होणार जाहीर सभा
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा झाल्यानंतर आता बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे. ही सभा बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी होणार आहे. या ग्राउंड ची पाहणी आज राष्ट्रवादीचे नेते वाल्मीक कराड यांनी पाहणी केले. शरद पवार पाठोपाठ अजित पवार बीडमध्ये येऊन काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी मधून अजित पवार बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर या प्रक्रियेमध्ये अजित पवार यांच्यासोबत महत्वाची भुमिका बजावणारे बीड जिल्ह्याचे नेते कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी खूप मोलाची भूमिका बजावली, यासह बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन आमदारांनी सुद्धा अजित दादांना पाठिंबा दिला, या सर्व बाबीच्या अनुषंगाने बीडमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर सभा घेत अनेकांवर निशाणा साधला. ही सभा होत नाही तोच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा येणाऱ्या 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये होत असून ही सभा बीड शहरातील छत्रपती संभाजी क्रीडांगण या ठिकाणी होणार आहे. सभेची वेळ दुपारी दोनची असून आज राष्ट्रवादीचे नेते वाल्मीक अण्णा कराड यांनी या ठिकाणची पाहणी केली. यावेळी बीड मतदार संघाचे नेते बळीराम गवते, युवा नेते बाळासाहेब गुजर यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.