Beed : देशभर साजरा होत असलेल्या आझादी का अमृतमहोत्सव निमित्ताने श्री विनायकराव माध्यमिक विद्यालय वैद्यकिन्ही येथील शाळेत / संस्थेचे सचिव मा श्री भागवत आण्णा आजबे , संस्थेचे अध्यक्ष मा श्री बाजीराव अण्णा बांगर व शाळेचे मुख्यध्यापक मा श्री बांगर सर यांनी आपल्या शाळेतील शिपाई श्री मच्छिंद्र लांडगे यांना ध्वजारोहनचा मान दिला. सातत्याने शाळेतील सर्व गोष्टींसाठी शिपायाचं मोठ योगदान असतं त्या निमित्ताने त्यांना आपण कोणत्या ना कोणत्या कामातून मान देन गरजेचे असतं. शिक्षक अन् शिपाई यामध्ये कोणतीच दरी नसुन एक माणुसकीचं दर्शन अन् एकोपा यातून दिसून आलं. शिपायाला ध्वजारोहनाचा मान दिल्याबद्दल पंचक्रोशीत सर्वत्र ठिकाणी शाळेचे मुख्यध्यापक बांगर सर व शिक्षक लोकांचं कौतुक केल जात आहे. ह्या सर्व गोष्टीबाबत शाळेचे सचिव मा श्री भागवत अण्णा आजबे यांनी मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.