बीड जिल्ह्याला मिळणार नवे पालकमंत्री धनंजय मुंडे
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : राजकारण अस्थिर बनत चालले असून आज राष्ट्रवादीचा मोठा गट फुटून शिंदे गट व भाजपासोबत जात असून आज संध्याकाळी सहा वाजता अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्याबरोबर तब्बल 30 ते 40 आमदारांचा पाठिंबा असून यातील नऊ आमदार शपथ घेणार आहेत. यामध्ये बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा समावेश असून त्यांना बीडचे पालकमंत्री पद मिळणार आहे. या राजकीय भूकंपामुळे मात्र राज्यात खळबळ माजली आहे.