नियमाप्रमाणे एक वाहन चालक परवाना काढण्यासाठी १४२० रुपये लागतात तर मग बाकीचे दोन हजार कोणाच्या खिशात?
ट्रॅकच्या नावाखाली सरास पाचशे रुपयांची लूट
बीड आरटीओ कार्यालयात मनमानी कारभार
चोर सुद्धा एवढे घाबरत नाहीत एवढे येथील अधिकारी अमोल सुद्रिक घाबरत आहे
प्रारंभ वृत्तसेवा
बीड येथील आरटीओ विभागामध्ये गेल्या काही वर्षापासून मनमानी कारभार पाहायला मिळत आहे. जर एखाद्या सर्वसामान्यांना वाहन परवाना काढायचा असेल तर त्याला शासन नियमाप्रमाणे चौदाशे वीस रुपयांच्या पावत्या घ्यावे लागतात परंतु बीड आरटीओ ऑफिस कार्यालयामध्ये एक वाहन परवाना काढण्यासाठी तब्बल चार हजार रुपये मोजावे लागतात. जर 1420 रुपये नियमाप्रमाणे लागत असतील तर बाकीचे पैसे कोणाच्या खिशात जातात, यामध्ये येथील अधिकाऱ्यांचे नेमकं चाललय तरी काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. यासह या ठिकाणी वाहन चालवण्यासाठी जो काही ट्रॅक लागतो त्या ट्रॅकच्या जागेसाठी पर व्यक्ती तब्बल पाचशे रुपये घेतले जातात. म्हणजे दिवसाला 300 लोकांकडून हे पाचशे रुपये जमा केले जातात. ही दिवसाढवळ्या सरळ सरळ लूट आहे. येथील अनागोंदी कारभाराकडे कोणी लक्ष देणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुळामध्ये शासनाचे कोणतेही कार्यालय हे सर्व सामान्यांच्या हितासाठी असते नियमाप्रमाणे काय चार्जेस असतात ते घेणे किंवा देणे हे बंधनकारक असते परंतु बीड आरटीओ कार्यालयामध्ये गेल्या काही वर्षापासून अनागोंदी कारभार पाहायला मिळत आहे नियमाप्रमाणे एक वाहन परवाना काढण्यासाठी 420 रुपये लागतात परंतु कोणताही नियम नसताना बाकीचे पैसे म्हणजे एका व्यक्तीला या ठिकाणी चार हजार रुपये द्यावे लागतात म्हणजे बाकीचे पैसे कोणाच्या खिशात जातात येथील कोणता अधिकारी आहे तो हे पैसे घेतो याचाही शोध घेणे गरजेचे आहे मुळामध्ये बीड जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो येथील लोकांसाठी शंभर रुपये सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे जर असे असेल तर हे अधिकारी दोन दोन हजार रुपये जास्त कशासाठी घेतात हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो . या सर्व प्रकाराकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी आता होत आहे.
येथील अधिकारी अमोल सुद्रिक चोरापेक्षाही जास्त घाबरत आहेत
या ठिकाणी कार्यरत असलेले अमोल सुद्रिक हे अधिकारी जरा जास्तच घाबरताना दिसताय, जर या ठिकाणी ट्रॅक वरती काम करत असताना काही फोटो घेण्यात आले तर एवढं घाबरण्याची काय गरज? मुळामध्ये जो चोर असतो तोच घाबरत असतो, हे अधिकारी जर चोर नसतील तर यांना घाबरण्याची काय गरज? असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.
एन के कडून ट्रेकच्या नावाखाली सरास लूट
या ठिकाणी एन के यांचा वाहन ट्रॅक उभारण्यात आलेला आहे. मुळात ही सर्व जागा एन के यांची आहे. यामुळे तो ट्रेकही यांचाच आहे. परंतु ट्रॅक च्या नावाखाली अतिरिक्त पाचशे रुपयांची लूट या ठिकाणी होत आहे. मुळामध्ये शासनाकडून ड्रायव्हिंग टेस्ट साठी पहिले तीनशे रुपये घेण्यात येतात, मग एन के वाल्यांकडून पाचशे रुपये का घेण्यात येतात? याकडे संबंधित अधिकारी का लक्ष देत नाहीत, का ह्या संबंधित अधिकाऱ्यांना एन के कडून काही हप्ता जातो? हे सुद्धा पाहणं महत्त्वाच आहे. तसेच हे अतिरिक्त 500 रुपयांची लूट तात्काळ थांबवण्याची मागणी होत आहे.













