पालकमंत्री असताना गेवराईला झुकते माप दिले ; भविष्यात कोणत्याही कामासाठी थेट पंतप्रधानापर्यंत जावू
गेवराई । आपण पालकमंत्री असतांना गेवराईच्या विकासाला सातत्याने झुकते माप दिले. अनेक कामांसाठी लक्ष्मण पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे गेवराईत मोठ्या प्रमाणात कामे झाली. भविष्यातही गेवराईच्या कोणत्याही कामांसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत आपण जावू, त्यासाठी आपण नगर पालिका निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना आणि नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेल्या गिताभाभी पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, सध्या घड्याळ कपाटात बंद करून ठेवा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी काल गेवराईच्या सभेत केले. माजी खा. प्रितमताई मुंडे यांनीही यावेळी भुमिका स्पष्ट करतांना गेवराई तालुका आणि शहर सातत्याने मुंडे घराण्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. त्याच पध्दतीने आम्ही ही बाळराजे पवार आणि बदामराव पंडित यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहु असे आश्वासन यावेळी प्रितमताई यांनी दिले.
ना. पंकजाताई मुंडे यांच्या या सभेमुळे भाजपाच्या विजयावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच झालं . पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणामध्ये विकासाच्या मुद्दयाबरोबरच आगामी काळात करण्यात येणाऱ्या कामांचाही लेखा जोखा मतदारांसमोर मांडला.
यावेळी माजी आ. बदामराव पंडित, बाळराजे पवार, माजी आ. लक्ष्मण पवार, सौ. गिरीकाभाभी पंडित, युध्दजित पंडित, शिवराज पवार यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, गेवराई शहराच्या विकासासाठी पवार कुटूंबिय सातत्याने प्रयत्नशिल असते. लक्ष्मण पवार यांनी सतत पाठपुरावा करून पाणी पुरवठा योजना, नाट्यगृह, सिमेंट रस्ते आदी विकास कामे मोठ्या प्रमाणात करून घेतली. मागील पंधरा वर्षात नगर पालिकेचा कारभार पवारांनी कशा पध्दतीने चालविला हे गेवराईकरांनी पाहिले आहे. त्यामुळेच गेवराईचा चेहरा बदलला आहे. गेवराई स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी काही पर्यावरणाचे उपक्रम आपण राबवू त्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल तसेच महामार्ग आणि गेवराई शहरात येणाऱ्या रस्त्याचे सुशोभिकरण यासाठी मी स्वतः केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे जावून तो प्रश्न मार्गी लावू तसेच महिला बचत गटातील महिलांच्या उत्पादनांना मार्केट मिळावे त्यासाठी स्वतंत्र इमारत उभी करू, सर्वसामान्य कुटूंबातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे त्यामुळे नगर पालिकेच्या निवडणुकीत गिताभाभी पवार यांच्यासह सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डाॅ प्रीतमताई मुंडे
माजी खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी देखील त्यांच्या खासदारकीच्या काळात लक्ष्मण पवार आणि बदामराव पंडित यांनी सातत्याने विकासाची कामे करून घेण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. बाळराजे पवार यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. त्यामुळे गेवराई शहराचा चेहरामोहरा आगामी काळात बदल्याशिवाय राहणार नाही असेही प्रितमताई मुंडे म्हणाल्या.