महांस्कृती महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेवरून मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन धर्मीयांच्या आस्था स्थळाचा समावेश का नाही?
बीडमध्ये जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांची मनमानी सुरूच
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : बीडमध्ये महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने बनवण्यात आलेल्या स्नेह निमंत्रण पत्रिकेवर मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन धर्मीयांच्या आस्था स्थळाचा समावेश का करण्यात आलेला नाही यामुळे जिल्हाधिकारी समाजासमाजामध्ये, धर्माधर्मामध्य भेदभाव करतात का? असा प्रश्न वरील प्रतापावरून निर्माण होत आहे. मुख्यमंत्रीसाहेब बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण जातीजातीत, धर्माधर्मात भेदभाव करण्यासाठी बीडला पाठवले आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होवू लागला आहे. भारत देशामध्ये अनेक जातीधर्माचे लोक एकत्र राहून गुन्यागोविंदाने एकत्र येतात, एकमेकांच्या सुखदु:खात जातात परंतु एखादा आयएएस अधिकारी जर असा भेदभाव करत असेल तर ती देशासाठी मोठी घातक गोष्ट ठरू शकते यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेवून जिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना कराव्यात अशी मागणी होत आहे.
24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान बीडमध्ये महासंस्कृती महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्नेहनिमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या आहेत. या पत्रिकेवर चक्क मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन धर्मीयांचा आस्था स्थळांचा समावेशच करण्यात आला नाही, विशेष म्हणजे या महासंस्कृती महोत्सवामध्ये सर्वधर्मीयांना योग्य ते स्थान देणे अपेक्षीत होते परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे या निमंत्रण पत्रिकेवरून काही स्थळांना मुद्दाम डावलण्यात आल्याची चर्चा होत आहे. यामुळे मुख्यमंत्री साहेब बीडच्या जिल्हाधिकारी यांना जातीजातीत धर्माधर्मात भेदभाव करण्यासाठी बीडला पाठवले का? असा संतप्त सवाल उपस्थित होवू लागला आहे. एखादा आयएएस अधिकारी ज्यावळेस आयएस पदाची शपथ घेतो त्यावेळेस त्या अधिकाऱ्याला ज्या त्या खुर्चीवर बसल्यावर सर्वांना समान न्याय देण्याची गरज असते परंतु बीडमध्ये घडलेल्या प्रकारावरून अधिकारी कशाप्रकारे भेदभाव करतात हे स्पष्ट होत आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करण्याची मागणी होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना फोनची ॲलर्जी
वरील घडलेल्या प्रकाराबद्दल जिल्हाधिकारी दिपा मुंडे-मुधोळ यांना कॉल केला असता त्यांनी फोन सिसिव्ह न केल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही, मान्य आहे जिल्हाधिकाऱ्यांना खुप कामे असतात, फोन घेण्यास वेळ नसतो परतु महत्त्वाच्या प्रश्नासंदर्भात तरी त्यांनी फोन घेणे अपेक्षीत आहे परंतु त्यांना फोनची ॲलर्जी असल्याचे दिसत आहे.