पाठक यांच्या पुढे अनेक आव्हाने; जलजीवनची कामे दर्जेदार होणे गरजेचे
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : बीड जिल्हा परिषदचे सीईओ म्हणून आज सायंकाळी अविनाश पाठक यांनी पदभार स्वीकारला. अविनाश पाठक यांच्यासमोर बीड जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, जलजीवनचे कामे दर्जेदार होणे, यासाठी त्यांना पुढाकार घ्यावा लागेल. यासह गेल्या काही महिन्यापासून जिल्हा परिषद मध्ये, जो भ्रष्टाचार झाला आहे त्याला आळा घालण्याचे आव्हान सुद्धा अविनाश पाठक यांच्यासमोर असणार आहे. पाठक यांनी पदभार घेतल्यानंतर येथील अधिकारी, कर्मचार्यांनी त्यांचे स्वागत केले.