• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, June 3, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला विविध विकासकामांचा आढावा

Prarambh Team by Prarambh Team
April 2, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

विमानतळ, रेल्वे तसेच महत्वाच्या प्रलंबित कामांना गती देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार


विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही

बीड :- बीड जिल्हयातील विमानतळ, रेल्वे कामाची सद्यस्थिती, राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा परिषदे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना, शिक्षण विभागाचे नवोपक्रम, इनक्यूबेशन सेंटर तसेच तारांगण, विद्युत वितरण, जिल्हयात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आज उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. बीड जिल्हयांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व सर्व मिळून काम करू, विमानतळ, रेल्वे तसेच महत्वाच्या प्रलंबित कामांना गती देण्यासोबतच विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आढावा घेतला. यावेळी पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, सर्वश्री आमदार सतिष चव्हाण, विक्रम काळे, प्रकाश सोळंके, सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडीत, उपमुख्यमंत्री यांचे सचिव राजेश देशमुख, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदित्य जीवने यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

बीड जिल्हयांच्या सर्वांगिण विकासासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन व आपण सर्व नागरिक यांचा समन्वय महत्त्वाचा आहे. राज्य शासनाकडून जिल्हयातील विकासकामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. अशी ग्वाही देतानाचा त्यांनी सांगितले की, अनेक वर्षापासून रेल्वेमार्गाच्या सुरू असलेल्या कामाला गती देण्यात येईल. विभागीय आयुक्त बीड रेल्वेबाबत दर महिन्याला आढावा घेतील. रेल्वे मार्गाच्या कामात कोणी अडथळा आणत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही, अशा प्रकरणी थेट सरकारी कामात अडथळा आणल्याबाबतचे गुन्हे नोंदविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

विमानतळासाठी आवश्यक जागा बीड शहरापासून 14 किमी अंतरावर असलेल्या कामखेडा नजीक निश्चित करण्यात आली आहे. रेल्वे तसेच विमानतळ सेवा गतीने पुर्ण करण्यात येईल, विमातळाबाबतच्या भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

आष्टी येथील वीज उपकेंद्राच्या कामाला गती देण्याचे निर्देश देत उपमुयमंत्री श्री. पवार म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात 2 कोटी घरकुल देण्याची योजना आहे, त्यात राज्यात 20 लाख घरकुल देण्यात येणार आहेत, बीड जिल्हयात सद्यस्थितीत 85 हजार घरकुलाचे काम सुरू आहे, येत्या कालावधीत 75 हजार घरकुले पुर्ण करण्याचे उदिष्ट ठेवून काम करूया. दिवाळी नव्या घरकुलात या उपक्रमाची सुरूवात श्री. पवार यांच्या हस्ते करण्यात आली. शासकीय निधीची वाट न पाहता घरकूल उभारणाऱ्या 10 कुटुंबाचा यावेळी श्री. पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान गुणवत्ता विकास अभियान 2025 या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. या उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधला जाणार आहे. विद्याथ्यांमध्ये झालेल्या शैक्षणिक सुधारणांतून भावी पिढी चांगली तयार व्हावी, या हेतूने संपूर्ण जिल्हयात हा उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक निधी देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक वर्गासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण मिळावे यासाठी 30 लाख रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यात गरज भासल्यास सीएसआर तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्याचीही आपली तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. शालेय परिसर संरक्षक भिंत, शौचालय, अंगणवाडी तसेच शैक्षणिक विकासाला सर्वाच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही असल्याचे श्री. पवार म्हणाले.

जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, आपल्या जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था चांगली यासाठी पोलीस प्रशासनासोबतच आपल्या प्रत्येकाची ती जबाबदारी आहे. पोलीस प्रशासनाला आवश्यक असलेला निधी तातडीने देण्यात येईल. पायाभूत सुविधा, वाहने तसेच पोलीस स्टेशनमध्ये आवश्यक त्या बाबींची तातडीची गरज पुर्ण करण्यासाठी 16 कोटी 34 लाख रूपयांचा निधी देण्यात येत असल्याचेही श्री. पवार म्हणाले. जिल्हयात यापुर्वी देण्यात आलेल्या शस्त्र परवान्याचीही पुन्हा पडताळणी करण्यात यावी. गरज तपासूनच शस्त्र परवाना देण्यात यावा,असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला येत्या वर्षात 50 वर्ष पुर्ण होत असल्याचे निमित्त साधून महत्त्वाच्या कामासाठी आवश्यक निधी शासन स्तरावरून देण्यात येईल. बीड सह लगत असलेल्या परभणी, लातूर व धाराशिव या चार जिल्हयातील रुग्णांची संख्या पाहता सर्व सुविधाही देण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

*मराठवाड्यातील पहिले कौशल्यवर्धन केंद्र*
शहराच्या मध्यवर्ती भागात आय. टी. आय. च्या तीन एकर परिसरात कौशल्यवर्धन केंद्र उभारण्यात येणार आहे. (Incubation center) टाटाच्या सहकार्याने हे केंद्र आकारास येईल. कंपनीतर्फ १६५.१० कोटी आणि एमआयडीसी कडून ३१.११ कोटी असे एकूण १९६.९८ कोटी खर्च करून याची उभारणी करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील हे पहिले कौशल्यवर्धन केंद्र ठरणार आहे. याआधी विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली व कोकणात रत्नागिरीत अशा केंद्राच्या कामाला सुरुवात झाली आहे.

 

*कालबद्ध निधी विनियोग*
यंदाच्या आर्थिक वर्षात नियोजनपूर्ण निधी विनियोग करण्याचे संकेत श्री. पवार यांनी दिले. लवकरच याबाबत बैठक घेऊन नियोजन निधीतील सर्व बाबी व यंत्रणा यांचा आढावा घेण्यात येणार असून तांत्रिक व प्रशासकीय मान्यता गतिमान पध्दतीने प्रदान करत डिसेंबर २०२५ पूर्वी निधी खर्च होईल तसेच काम दर्जेदार होईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

*आकर्षक असेल तारांगण*
एक उत्तम आणि अद्ययावत तारांगण उभारण्यात येणार आहे. यामध्ये सर्व जिल्हाभरातील शाळकरी मुलांना सहलीच्या माध्यमातून माहिती मिळावी हा या उभारणीचा हेतू आहे. बीड शहरात येणाऱ्या प्रत्येकासाठी एक उत्तम पर्यटन स्थळ देखील या तारांगणाच्या रूपाने उभे राहणार आहे. येथील आयटीआयच्या मोकळ्या जागेत २० कोटी रूपयांचा निधीतून तारांगण उभारण्याची योजना आहे. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध कलाकृती आणि जिल्हयातील प्रेक्षणीय स्थळांच्या प्रतिकृती ठेवण्याचे नियोजन आहे.

जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नव्याने उभारण्यात येत असलेल्या विमानतळ, रेल्वे मार्गाची स्थिती तसेच सुरू असलेल्या विविध विकास कामांबाबत सादरीकरण केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदित्य जीवने, जिल्हा पोलीस अधीक्षक नववीन काँवत यांनीही आपल्या विभागाच्या वतीने सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली.
यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.





Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या बीड दौरा

Next Post

अनिलदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्त समाज बांधवांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026
Next Post
अनिलदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्त समाज बांधवांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!

अनिलदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्त समाज बांधवांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!

जालन्यातील गावागावात ना. पंकजाताई मुंडे यांचे जंगी स्वागत

जालन्यातील गावागावात ना. पंकजाताई मुंडे यांचे जंगी स्वागत

अजितदादांच्या बैठकीत आ.क्षीरसागरांनी मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न मांडले

अजितदादांच्या बैठकीत आ.क्षीरसागरांनी मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न मांडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा