बजरंग सोनवणेंच्या प्रचारार्थ शहर आणि ग्रामीण भागात कॉर्नर सभा
बीड प्रतिनिधी :- इंग्रजांना या देशातून हाकलून देण्यासाठी ज्याप्रकारे लोक एकत्र आले होते त्याचप्रकारे आता सविंधानाचे रक्षण करण्यासाठी भाजपाला हाकलून देण्यासाठी सर्व जातीधर्माचे लोक एकत्र आले आहेत. आणि इतिहासात ज्याप्रकारे सर्व भारतीयांनी मिळून देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले त्याचप्रकारे आताही सर्व देशवासी मिळून भाजपाच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करणार आहेत. असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी बजरंग सोनवणेंच्या प्रचारार्थ झालेल्या कॉर्नर सभांमध्ये केले.
सध्या बीड मतदारसंघातील शहर आणि ग्रामीण भागात जाऊन महाविकास आघाडीचे लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी आ.संदीप क्षीरसागर कॉर्नर सभा घेत आहेत. दरम्यान सोमवारी (दि.७) रोजी सायंकाळी बीड शहरातील पेठ बीड भागातील बालाजी मंदिर येथे व सुभाष रोड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे, माजी मंत्री सुरेश नवले व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उपस्थितीत कॉर्नर सभा झाली. तसेच मंगळवार (दि.७) रोजी बीड तालुक्यातील विविध गावांमध्ये तसेच शहरातील नवा मोंढा येथे आ.संदीप क्षीरसागर यांनी कॉर्नर बैठका घेतल्या. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनील धांडे तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.