बीड मधील २७ आॅगस्टची सभा होणारच — मंञी धनंजय मुंडे
प्रसारमाध्यमांनी खात्री केल्याशिवाय चुकीच्या बातम्या प्रसारित करू नयेत
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : बीड शहरामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सभा झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा येणाऱ्या 27 ऑगस्ट रोजी बीड शहरातील छत्रपती संभाजी क्रीडांगण याठिकाणी होणार असून या मैदानाची पाहणी काल राष्ट्रवादीचे नेते वाल्मिक अण्णा कराडयांनी केले. यानंतर आज काही प्रसारमाध्यमांकडूनही सभा रद्द होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर यासंदर्भात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत 27 ऑगस्टची सभा होणारच असून या सभेसंदर्भात रद्द होण्याची शक्यता असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या. या सर्व बातम्या चुकीच्या असून प्रसारमाध्यमांनी आम्हाला विचारून अशा बातम्या प्रसारित कराव्यात असं मतंही ट्विटमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.