परळी वैद्यनाथ – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना बीड तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळताना दिसून येत असून आज युवा नेते बळीराम अप्पा गवते यांच्या मार्गदर्शनाखाली बीड तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाला जाहीर समर्थन दिले आहे.
बीड तालुक्यातील नागापूर खुर्द, नागापूर बुद्रुक, काळेगाव (हा.), गुंधावाडी, मानकुरवाडी या पाच ग्रामपंचायतींनी आज जाहीर समर्थानाचे पत्र परळी येथे ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी युवा नेते बळीराम अप्पा गवते, बीड युवक आघाडीचे शहराध्यक्ष सचिन जाधव, काळेगाव हवेलीचे सरपंच भारत कानाडे, मानकुरवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर जोगदंड, नागापूर बु.चे सरपंच सिद्धार्थ ढोकने, गुंधावाडीच्या सरपंच सविंदा माने, नागापूर खु.चे सरपंच नारायण साळुंखे, अमोल राऊत, राहुल साळुंखे यांसह आदी उपस्थित होते.