पंकजाताई मुंडे यांची भूमिका भविष्याच्या अनुषंगाने ठरणार निर्णायक!
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : राजकारणात कधी काय होईल याचा नेम नसतोच, हे आता सत्यात उतरताना दिसत आहे. राज्यातील राजकारण अस्थिर बनले असून कधी काय होईल हे सांगणे माञ कठीण बनले आहे. आज राष्ट्रवादीचा मोठा गट शिंदे—फडणवीस सरकार मध्ये गेल्यानंतर राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले. दुसरीकडे मात्र आता महाराष्ट्रातील दिग्गज नेत्या पंकजाताई मुंडे यांनी भूमिका घेण्याची हीच ती वेळ असल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगू लागली आहे. पंकजाताई मुंडे यांना निर्णायक भूमिका घेण्यासाठी हीच ती खरी वेळ असल्याचे मत सुद्धा सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.