11 जागांवर विजय मिळवत काकांना दिली मात
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : बीड बाजार समितीवर गेल्या 40 वर्षापासून काका म्हणजे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची एक हाती सत्ता होती, यावेळेस सुद्धा यात म्हणावा असा बदल होणार नाही असा ठाम विश्वास माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केला होता. परंतु निकालाची सुरुवात झाली आणि सुरुवातीलाच राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पॅनलचे चार उमेदवार विजयी झाले, त्यानंतर सेवा सोसायटीमध्ये सुद्धा त्यांना यश आल्या नंतर एकूण 15 जागेवर शेतकरी विकास पॅनलला यश संपादन करता आले. तर दुसरीकडे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मात्र 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 40 वर्षाची सत्ता उलटून टाकत आमदार संदीप क्षीरसागर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी मात्र बीड बाजार समिती ताब्यात घेत परिवर्तन घडवून आणले.