माजी मुख्यमंञी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचा निर्णय आघाडी सरकारच्या अंगलट
राजीनामा दिला नसता तर आम्ही परत सरकार स्थापन करू शकलो असतो — कोर्ट
हायकोर्टाचे पहिले तीन निरीक्षणे ठाकरे गटाच्या बाजूने
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : सत्ता संघर्ष चा निकाल आज दिल्लीमध्ये हायकोर्टात सुरू असून पहिल्या तीन निरीक्षणामध्ये हायकोर्टाने ठाकरे बाजूच्या बाजूने मत व्यक्त केले आहे. भरत गोगावले यांचा यांची नियुक्तीच बेकायदेशीर, राज्यपालाने बहुमत चाचणी केली ती बेकायदेशीर, राज्यपालाने बहुमत चाचणी घेण्याची गरजच नव्हते, राज्यपालांच्या निर्णयावर हायकोर्टाने ताशेरे ओढले आहैत. पहिल्या तीन निरीक्षणामध्ये शिंदे सरकारला मोठा झटका बसला असला तरी शिंदे सरकार सध्या तरी वाचले आहे. अपाञ आमदारांचा निर्णय लवकर अध्यक्षांनी घ्यावा असे सुद्धा कोर्टाने सांगितले. यामुळे १६ आमदारांचा अपाञ निर्णय अध्यक्ष काय घेतात याकडे पहावे लागेल.