• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, February 13, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Home बीड जिल्हा गेवराई

महामार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट करा – आ. विजयसिंह पंडित

Prarambh Team by Prarambh Team
July 22, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

आ. पंडित यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न


बीड प्रतिनिधी ः- मौजे गढी येथील उड्डाण पुलावर झालेल्या अपघात प्रकरणी आ. विजयसिंह पंडित यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून चर्चा उपस्थित केल्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. महामार्गावरील ब्लॅकस्पॉटच्या अनुषंगाने उपाययोजना करावी, राष्ट्रीय महामार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, उड्डाण पुलाची कामे तात्काळ सुरु करावीत यांसह अपघात रोखण्यासाठी कायमस्वरुपी उपाय योजना करून महामार्गाच्या दुरुस्तीची कामे तातडीने सुरु करण्याचे निर्देश आ. विजयसिंह पंडित यांनी या बैठकीत दिले, तर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी गांभीर्याने कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. बैठकीला सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गेवराई विधानसभा मतदार संघातून जाणाऱ्या सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर दि.२६ मे रोजी झालेल्या अपघातात सहा तरुणांचा दुर्दैवी मृत्यु झाला होता. या घटनेनंतर आ. विजयसिंह पंडित यांनी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी कायमस्वरुपी उपाय योजना करण्याकरीता सातत्याने पाठपुरावा सुरु केला आहे. पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय विधानसभेत उपस्थित केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात या बाबत मंगळवार, २२ जुलै रोजी आ. पंडित यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला आ. विजयसिंह पंडित यांच्यासह जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता सुर्यकांत गलांडे, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाचे अभियंता आशिष देवतकर, कार्यकारी अभियंता आर.पी.तोंडे, तहसिलदार संदिप खोमणे, महामार्ग विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक लंके, वाहतुक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक जाधवर, सर्व्हेअर दिपक राऊत यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गढी उड्डाण पुलावरील अपघातानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सादर केलेल्या विश्लेषणात्मक अहवालात हा पुल तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असल्याचे नमुद करून अपघाताच्या ठिकाणी उपाययोजना सुचविल्या आहेत. आ. पंडित यांनी विधानसभेत या बाबत आवाज उठविल्यानंतर अपघात स्थळी कामे झाली असली तरी प्रत्यक्षात पुन्हा त्याठिकाणी पाणी साठत आहे. याप्रकरणी आ. विजयसिंह पंडित यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून उड्डाण पुलाची तांत्रिक बाजू तपासण्यासाठी महामार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची यानिमित्ताने सूचना केली. महामार्गावरील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट तात्काळ सुरु करण्याच्या सूचना करून रस्त्यावरील खड्डे बुजवून दुरुस्तीची कामे सुरु करण्याच्या सूचनाही आ. विजयसिंह पंडित यांनी केल्या.

कल्याण-विशाखापट्टनम् या महामार्गावरील मौजे सिरसदेवी येथील महामार्गावरील पाण्याचा कायमस्वरुपी निचरा करून रस्त्याची दुरुस्ती करण्यासह गढी ते माजलगाव या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली असून ही कामे करण्यासाठी लेखी व तोंडी आजवर पाठपुरावा केला असून ही कामे तात्काळ सुरु करण्याची सूचना आ. विजयसिंह पंडित यांनी केली. गढी ते माजलगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे ५६ कोटी रुपये किंमतीच्या कामाचे कार्यारंभ आदेश निर्गमित झाले असून सिरसदेवीसह इतर ठिकाणच्या रस्ता नुतणीकरणाची कामे महिनाभरात सुरु होणार असल्याची माहिती महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता सुर्यकांत गलांडे यांनी दिली. गेवराई विधानसभा मतदार संघातून जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील ब्लॅकस्पॉटच्या संदर्भाने तात्काळ उपाय योजना करण्याच्या सूचना आ. विजयसिंह पंडित यांनी या बैठकीत दिल्या.

गेवराई शहराच्या दोन्ही प्रवेशिकेजवळ उड्डाण पुलाची कामे तातडीने सुरु करण्यासाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात बैठकीत चर्चा होऊन ही कामे सुध्दा लवकरात लवकर सुरु होणार असल्याची माहिती संबंधितांनी दिली. आजच्या बैठकीच्या निमित्ताने झालेल्या चर्चेनुसार गांभीर्याने कार्यवाही करून अपघात मुक्त महामार्ग करण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले.





Previous Post

खड्डा झाला पालकमंत्री तर बाकी खड्डे पालकमंत्र्याची पिलावळं नवं पर्वाची थीम घेऊन मिरवणाऱ्यांना बारामती दाखवा – उल्हास गिराम

Next Post

धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागाची ती खरेदी नियमानुसारच – उच्च न्यायालयाचा निर्णय

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

December 10, 2025
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

December 4, 2025
उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

December 4, 2025
निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

November 29, 2025
स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

November 29, 2025
अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

November 29, 2025
शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

November 29, 2025
गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

November 29, 2025
Next Post
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागाची ती खरेदी नियमानुसारच - उच्च न्यायालयाचा निर्णय

ज्या दिवशी जात आड करून राजकारण करण्याची पाळी येईल, त्यादिवशी राजकारण सोडून देऊ – धनंजय मुंडे यांचे सर्वसमावेशक व सहिष्णू वागणुकीचे आवाहन

ज्या दिवशी जात आड करून राजकारण करण्याची पाळी येईल, त्यादिवशी राजकारण सोडून देऊ - धनंजय मुंडे यांचे सर्वसमावेशक व सहिष्णू वागणुकीचे आवाहन

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा