कॉर्नर सभेतून एकमुखाने लोकांचा निश्चय
बीड प्रतिनिधी – राजुरी न. जिल्हा परिषद गटातून आ.संदीप क्षीरसागरांना सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार राजुरी येथे झालेल्या कॉर्नर सभेतून उपस्थित नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला.
सोमवार (दि.११) रोजी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ राजुरी नवगण जिल्हा परिषद गटाची कॉर्नर सभा राजुरी येथील श्री मंगलमूर्ती देवस्थान परिसरात पार पडली. या सभेसाठी राजुरी नवगण जिल्हा परिषद गटातील सर्व गावातून नागरिक उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी एकमुखाने, आ.संदीप क्षीरसागर यांना आम्ही आमच्या गटातून सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचे एकमताने उपस्थितांनी सांगितले.