प्रारंभ वृत्तसेवा
Beed : विधानसभा 2024 निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक जण आपापल्या परीने निवडणुकीची तयारी करताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी गेवराई मतदार संघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी पालकमंत्र्याविरुद्ध तीव्र नाराजगी व्यक्त करत, माझ्या घरातला उमेदवार येणाऱ्या निवडणुकीत नसणार असल्याचे असं मत व्यक्त केले होते. यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता, आज (ता. २०) आमदार लक्ष्मण पवार यांनी सिल्वर ओक जाऊन शरद पवारांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यानंतर गेवराई मतदार संघात आ. पवार विरोधात पोस्ट व्हाअरल होत आहेत. लोकसभेत आजारी, विधानसभेत तुतारी. नोटंकी अशा सुद्धा पोष्ट फिरत आहेत.
गेवराई मतदार संघाचे आमदार लक्ष्मण पवार यांनी गेल्या काही दिवसापुर्वी जर सर्वसामान्यांची कामे होत नसतील तर त्या पदावर राहून काय फायदा. असे मत व्यक्त केले होते. तसेच येणाऱ्या निवडणुकीत आमच्या घरातील उमेदवार नसणार असल्याचे मत व्यक्त केलं होते. पण आज तर त्यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचेही समजत आहे. या भेटीनंतर मात्र गेवराई मतदार संघात सोशल मीडियावर नौटंकी अशा पोस्ट सुद्धा आता व्हायरल होऊ लागल्या अहेत. आमदार लक्ष्मण पवार यांनी सर्वसामान्य उमेदवारांना संधी देणार असल्याचे मत व्यक्त केलं होतं यानंतर ते स्वतःच शरद पवारांना भेटल्यामुळे त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर तीव्र भावना सुद्धा व्यक्त होत आहेत. आज झालेल्या भेटीमुळे माञ भाजपा आमदार लक्ष्मण पवार तुतारीच्या वाटेवर असल्यास दिसत आहे.