-शहरात पार पडलेल्या नियोजन बैठकीला जिल्ह्यातील बांधवांची उपस्थिती
-छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण येथे रॅलीचा समारोप जाहिर सभेने होणार
बीड : मराठा समाजाच्या मागण्या सरकार दरबारी प्रलंबित असून मनोज जरांगे यांनी सुरु केलेला लढा अजून सुद्धा सुरुच आहे. सरकारला 13 जुलै पर्यंत वेळ दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात शांतता रॅल्यांचे आयोजन केले आहे. बीड शहरात 11 जुलैला भव्य दिव्य शांतता रॅली काढण्यात येणार आहे. याच अनुषंगाने आज (ता. 23) शहरातील सुर्या लॉन्स येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्ह्यातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही रॅली विश्वरत्न डा. बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी असणार आहे. या रॅलीचा समारोप मनोज जरांगे पाटील यांच्या जाहिर सभेने छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण येथे होणार आहे.
लोकसभा निवडणूकीनंतर मराठवाड्यातील वातावरण दुषित बनले आहे. निवडणूका संपल्या तरी येथील तणाव आहे तशाच असल्याचे दिसत आहे. त्यात मराठा समाजाच्या मुख्य मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेला लढा अजून सुद्धा सुरुच आहे. मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांनी आठही जिल्ह्यात शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. बीड मध्ये 11 जुलैला भव्य दिव्य अशी शांतता रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली डॉ. बाबासाहेब चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी असणार आहे. या रॅलीत जिल्ह्यातील लाखो मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रिडांगण येथे रॅलीचा समारोप मनोज जरांगे पाटील यांच्या जाहिर सभेने होणार आहे. याच अनुषंगाने आज बीड मध्ये नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
मुक मोर्चा नंतर लाखोच्या संख्येने मराठे परत येणार एकत्र
2016 मध्ये ज्या प्रकारे राज्यभरात मुक मोर्चे काढण्यात आले होते. याची दखल संपुर्ण जगाने घेतली होती. या मुक मोर्चाची सुरुवात बीड मधून झाली होती. नंतर संपुर्ण राज्यभरात मुक मोर्चे काढण्यात आलेे. त्यानंतर परत जिल्ह्यातील मराठे लाखोच्या संख्येने एकत्र येणार आहे. यामध्ये मराठा समाजातील महिला, वयोवृद्ध नागरिक, मुले, युवक संपुर्ण घरदारच या शांतता रॅलीत सहभागी होणार आहे. मुक मोर्चा ज्या प्रकारे शांतते पार पडला, त्याच प्रकारे शांतता रॅली सुद्धा शांततेत पार पाडण्यासाठी आयोजक तयारीला लागले आहेत.
मनोज जरांगे पाटील घेणार रॅलीत सहभाग
मराठा आरक्षणासाठी ज्यांनी राज्यभरातील मराठा समाज एकत्र केला असे मनोज जरांगे पाटील हे बीड मध्ये होत असलेल्या शांतता रॅलीत सहभागी होणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी ओपन व्हॅन ठेवण्यात येणार आहे. या व्हॅन मध्ये फक्त मनोज जरांगे पाटील असणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे भव्य दिव्य असे स्वागत बीड शहरात करण्यात येणार आहे. या सर्व बाबींच्या अनुषंगाने मराठा समाजाच्या वतिने चोक नियोजन करण्यात येत आहे.