• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 12, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

Beed : येणार्‍या वार्षिक अर्थसंकल्पात बीड बायपासला स्लिप सर्व्हिस रोड व उड्डाणपुल करून देणार

Prarambh Team by Prarambh Team
June 26, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे औरंगाबाद खंडपीठात शपथपत्र

आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम यांच्या प्रयत्नांना यश

बीड  प्रतिनिधी :- बीडमधून जाणारा औरंगाबाद-येडशी राष्ट्रीय महामार्ग नऊ वर्षांपुर्वीच पुर्ण झाला आहे. या महामार्गावर बीड शहराच्या बाजुने 12 कि.मी. चा बायपास गेला आहे. परंतु शहरात प्रवेश होणार्या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल आवश्यक असताना या ठिकाणांवर उड्डाणपूल नाही. तसेच परळी रोड, नाथापुर रोड, इमामपुर रोड या ठिकाणी स्लिप सर्विस रोडही करण्यात आलेले नाही. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी वारंवार अधिवेशनात, शासनस्तरावर याबाबत पाठपुरावा केला होता, तरीही यावर उपाय न झाल्याने शेवटी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर आता खंडपीठाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून येणार्या वार्षिक अर्थसंकल्पात उड्डाणपूल आणि आवश्यक ठिकाणी स्लिप सर्विस रोड करणार असे शपथपत्र घेतले आहे.
औरंगाबाद-येडशी राष्ट्रीय महामार्ग मागच्या नऊ वर्षांपुर्वीच पूर्ण झालेला आहे. बीड शहराच्या बाजुने एकूण 12 कि.मी. चा बायपास गेला आहे. बीड शहरात येण्यासाठी दोन्ही बाजूंनी चौक आहेत. इंडियन रोड काँग्रेस च्या मार्गदर्शक तत्वांनुसार सध्याच्या छत्रपती संभाजी महाराज चौक बार्शी रोड आणि महालक्ष्मी चौक जालना रोड या दोन्ही ठिकाणांवर उड्डाणपूल आवश्यक आहे. तसेच परळी रोड, नाथापूर रोड राज्यमार्ग या ठिकाणी 11 सप्टेंबर 2018 रोजी स्लिप सर्व्हिस रोड मंजुर आहे. परंतु अद्यापपर्यंत याचे काम सुरू झालेले नाही. तसेच इमामपुर रस्ता हा प्रमुख जिल्हा मार्ग क्र.74 असून या ठिकाणीही स्लिप सर्व्हिस रोडची आवश्यकता आहे. तरीही याठिकाणचा स्लिप सर्व्हिस रोड मंजुर करण्यात आला नाही. आ.संदीप क्षीरसागर यांनी या बाबत राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून इमामपुरला स्लिप सर्व्हिस रोड मंजुर करून या भागातील शेतकर्‍यांच्या दळणवळणाची सोय करावी अशी मागणी दि.4 डिसेंबर 2019 रोजी पत्राद्वारे केली होती. यावर मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित विभागाला इमामपुर रोड या ठिकाणी स्लिप सर्व्हिस रोड मंजुर करावा अशी सूचना दिली होती. परंतु तरीही इमामपुर रोडला स्लिप सर्व्हिस रोड दिला गेला नाही.
तसेच बीड आणि गेवराई उड्डाणपुलाचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक औरंगाबाद यांनी राष्ट्रीय महामार्ग नागपूर प्रादेशिक कार्यालयाकडे पाठवला होता. हा प्रस्ताव नागपुर प्रादेशिक कार्यालयाने मंत्रालयाकडे पाठवला होता. परंतु राष्ट्रीय महामार्ग कार्यालय दिल्ली यांनी गेवराई उड्डाणपूलाचा प्रस्ताव मंजूर केला पण बीडचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला. बीड शहरासाठी आवश्यक असलेले स्लिप सर्व्हिस रोड आणि उड्डाणपुल वारंवार पाठपुरावा करून देखिल मंजुर होत नसल्याने शेवटी आ.संदीप क्षीरसागर यांनी मा.उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सदरील याचिका क्रमांक 1176 ऑफ 2024 च्या दि.30 जानेवारी 2024 रोजीच्या सुनावणीत औरंगाबाद खंडपीठाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दि.23 फेब्रुवारी 2024 पर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले होते. यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे औरंगाबाद प्रकल्प संचालक श्री.रविंद्र इंगोले यांनी दि.8 मे 2024 रोजी न्यायालयात शपथपत्र दाखल करून आम्ही येणार्या आर्थिक वर्षात या कामांना मंजुरी घेऊन काम पूर्ण करु असे सांगितले. सदरील याचिकेवर दि.28 जून 2024 रोजी अंतिम आदेश होणार आहे. दरम्यान या विषयात आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

दोन वर्षांत 17 लोक मृत्युमुखी
बीड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या, छत्रपती संभाजी महाराज चौक आणि महालक्ष्मी चौक याठिकाणी केवळ उड्डाणपूल नसल्याने गेल्या दोन वर्षांत तब्बल 17 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर असंख्य लोक याठिकाणी अपघात होऊन जखमी झाले आहेत.

चौकट
राजकारणातून लोकांचा जीव धोक्यात!
गेवराई आणि बीड या दोन्ही शहरांसाठी उड्डाणपूल प्रस्तावित असताना गेवराईचा उड्डाणपूल मंजूर होतो पण बीडचा नाही! अशी परिस्थिती राजकीय मतभेदातून झाली आहे. गेवराई चे आमदार भाजपा चे आहेत आणि बीडचे आमदार विरोधी पक्षाचे आहेत हेच यामागचे बहुतेक कारण असावे.

Previous Post

बीड मध्ये परत लाखोंच्या संख्येने मराठे एकवटणार!

Next Post

न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिकेकडील वीज थकबाकी भरून पाणीपुरवठा सुरळीत करा – आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम यांची मागणी

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
Next Post
न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिकेकडील वीज थकबाकी भरून पाणीपुरवठा सुरळीत करा – आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम यांची मागणी

न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिकेकडील वीज थकबाकी भरून पाणीपुरवठा सुरळीत करा - आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम यांची मागणी

स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष साबळे यांची बदली; गणेश मुंडे यांनी घेतला तात्काळ पदभार.!

स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष साबळे यांची बदली; गणेश मुंडे यांनी घेतला तात्काळ पदभार.!

Beed : बीडचे नवे जिल्हाधिकारी अविनाश पाठक

Beed : बीडचे नवे जिल्हाधिकारी अविनाश पाठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा