• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, April 22, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

आमचा बजरंग सोनवणेंना बिनशर्त पाठिंबा; प्रा.सुरेश नवलेंनी भूमिका केली जाहीर

Prarambh Team by Prarambh Team
April 30, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

कार्यकर्त्यांच्या भावनांचा केला विचार


भाजपच्या दबावामुळे शिवसैनिकांचे राजकीय मातेरे झाले
शिवसेना मुख्यमंत्री चालवतात की भाजप?
कार्यकर्ता संवाद मेळाव्यात प्रा.सुरेश नवले आक्रमक

Beed : मोठ्या विश्वासाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत आम्ही गेलो परंतू त्याचा काहीच उपयोग झाला नाही. भाजपच्या राजकीय दबावाला बळी पडून शिवसेना खिळखिळी होत असल्याचं दु:ख माझ्यासह शिवसैनिकाला न पचणारं आहे. उद्याच्या लोकसभा निवडणूकीत बीड मतदारसंघामध्ये आम्ही मविआचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा देत असून त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने कार्यकर्ते जिवाचे रान करतील असा विश्वास प्रा.सुरेश नवले यांनी बोलून दाखविला. मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेवूनच आपण हा निर्णय घेत असल्याचेही नवले यावेळी म्हणाले. बीड शहरातील सुर्या लॉन्स या ठिकाणी आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी बोलताना प्रा.सुरेश नवले पुढे म्हणाले, स्व.बाळासाहेब ठाकरे यांंच्या विचारांना पुढे नेण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत असा विश्वास आम्हाला होता परंतू काही दिवसांमध्ये आमचा भ्रमनिरास झाला. शिवसेनेमध्ये काम करत असताना पक्ष संघटन वाढविण्यासाठी जबाबदारी देण्याचे वचन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले होते परंतू त्यांनी फक्त पक्षामध्ये आम्हाला बसवून ठेवण्याचे काम केले. त्यामुळे आमच्यासह कार्यकर्त्यांचीही निराशा झाली. जो विचार ठेवून आम्ही शिवसेनेमध्ये आलोत त्याच विचारालो मुठमाती देण्याचं काम नेतृत्वाकडून होत आहे. भाजपने शिवसेनेला प्रत्येक वेळी खाली दाखविण्याचं काम सुरू केले आहे. त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा अंकुश मुख्यमंत्र्यांचा राहिलेला नाही. त्याचाच परिपाक म्हणून सध्या चालू असलेल्या लोकसभा निवडणूकीत शिवसेना पक्षाच्या अनेक विद्यमान खासदारांना देखील मुख्यमंत्री उमेदवारी मिळवून देवू शकले नाहीत. याचा प्रचंड रोष सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कायर्कर्त्यांमध्ये आहे. खर्‍या अर्थाने जनतेमध्ये जावून काम करणार्‍या लोकप्रतिनिधींनाच संधी मिळत नसल्याने त्यांचं राजकीय आयुष्यात मातेरे झाले. शिवसैनिकांची मोठी अपेक्षा होती की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराप्रमाणे शिवसेना चालेल परंतू तसे होताना दिसत नाही. सामान्य शिवसैनिकांना न्याय मिळत नाही. भारतीय जनता पार्टीच्या दबावाला झुगारून शिवसैनिकांना मुख्यमंत्री न्याय देतील अशी अपेक्षा होती परंतू तीही फोल ठरल्याचे दिसत आहे. शिवसेना मुख्यमंत्री चालवतात की भाजप ? असा संभ्रम आता निर्माण झाला असून भाजप आपला पक्ष बळकट करत असताना शिवसेनेला मात्र खिळखिळी करत आहे. दुर्दैवाने भाजपच्या राजकीय दबावाला मुख्यमंत्री बळी पडलेले दिसत असल्याचंही यावेळी प्रा.नवले म्हणाले. मेळाव्याच्या सुरूवातीलाच काही कार्यकर्त्यांनी आक्रमपणे आपल्या भूमिका मांडल्या. ज्या ठिकाणी सन्मान होत नाही त्या ठिकाणी थांबायचे कशाला असाही सूर कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत होता. याच अनुषंगाने देखील विचार करत आपण मविआचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना आपला पाठिंबा जाहीर करू असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. त्यामुळेच याच ठिकाणी प्रा.सुरेश नवले यांनी देखील कार्यकर्त्यांच्या मताचा आदर करून सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी मोठ्या संख्येने प्रा.सुरेश नवले मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
(चौकट)
लोकसभेत ही अवस्था तर…
लोकसभेच्या निवडणूकीमध्ये ही अवस्था तर 288 जागेच्या विधानसभेच्या निवडणूकीत काय अवस्था राहील याची कल्पना जरी केली तरी शिवसेनेच्या भविष्याचा अंदाज येतो. शिवसेना चर्चेच्या तहामध्ये पूर्णत: हरलेली असून याचा फटका निश्चितच पक्षाला बसलेला असल्याचेही प्रा.नवले यावेळी म्हणाले.

(चौकट)
भाजपच्या भट्टीत…
जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी भाजपची स्वतंत्र साथ पकडली आहे तेव्हापासून शिवसैनिकांची कुचंबना होत असल्याचे दिसून येत असून आजच्या लोकसभा निवडणूकीत सुध्दा अनेक ठिकाणी याचा प्रत्यय येत आहे. कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या ‘भाजपच्या भट्टीत शिवसैनिकांचे बळी’ हे बॅनर्स विशेष लक्ष वेधणारे ठरले. नेहमीच आपल्या वक्तृत्वाने सभा खिळवून ठेवणार्‍या प्रा.सुरेश नवले यांच्या या बॅनरचीही चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.

तू भी एक सिकंदर है !
प्रा.सुरेश नवले यांचे भाषण म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक बळ देणारी पर्वणीच असते. भाषणा दरम्यान त्यांनी एक उर्दुमधील शेर म्हटला आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी देखील याला भरभरून दाद दिली.
“तजुर्बा कह रहा हूँ दोस्त
ये गम, ये डर, ये दर्द सबकुछ तेरे अंदर है ।
खुद बनाये इस पिंजरे से निकल कर देख
तू भी एक सिकंदर है ।”
सध्या शिंदे सेनेच्या बाबतीत हा शेर तंतोतंत लागू पडल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याच्या प्रतिक्रिया देखील कार्यकर्त्यांमधून मेळाव्याच्या ठिकाणी व्यक्त होत होत्या.





Previous Post

बीड शहरास पाणी पुरवठा उशिराने होणार नागरिकांनी सहकार्य करावे – नीता अंधारे

Next Post

पालकमंत्र्यांना बहिणीला पाडण्याची घाई झाल्याचे त्यांच्या भाषणातून जाणवते – बजरंग बप्पा सोनवणे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
Next Post
पालकमंत्र्यांना बहिणीला पाडण्याची घाई झाल्याचे त्यांच्या भाषणातून जाणवते – बजरंग बप्पा सोनवणे

पालकमंत्र्यांना बहिणीला पाडण्याची घाई झाल्याचे त्यांच्या भाषणातून जाणवते - बजरंग बप्पा सोनवणे

सरपंचांना दारात येवू नका म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांना जनतेला मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही – बजरंग बप्पा सोनवणे

सरपंचांना दारात येवू नका म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांना जनतेला मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही - बजरंग बप्पा सोनवणे

Beed : मतदान जागरुकतेसाठी नृत्यछटाचा आविष्कार

Beed : मतदान जागरुकतेसाठी नृत्यछटाचा आविष्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

तारखेनुसार बातमी शोधा !

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा