• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, July 3, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

संतांची भेट झाली की देवाची भेट होते – ह.भ.प. प्रकाश महाराज साठे

Prarambh Team by Prarambh Team
October 8, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

शिवाजीराव दादा पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात तुकोबारायांच्या अभंगावर केले चिंतन

गेवराई  प्रतिनिधी : संसारामध्ये कष्ट केल्याशिवाय काही भेटत नाही तसे संतांची भेट पुण्याई केल्याशिवाय होत नाही. संसार करत असतानाच परमार्थ सुद्धा केला पाहिजे, संतांची सेवा केली पाहिजे कारण संतांची सेवा सर्वात महत्त्वाचे आहे. एकदा संतांची भेट झाली की जीवनात काही करायचे शिल्लक राहत नाही. संतांची भेट झाली की देवाची भेट झाली असे समजावे असे चिंतन ह. भ. प. प्रकाश महाराज साठे यांनी केले. शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवात कीर्तन सेवा करताना ते बोलत होते.

माजी मंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त शिवनगरी गेवराई येथे कीर्तन महोत्सव थाटामाटात संपन्न होत आहे. शनिवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी रात्री ह. भ. प. प्रकाश महाराज साठे यांचे कीर्तन झाले. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या ‘ कोण पुण्याईचा होईल सेवक ‘ या अभंगावर निरूपण केले. जगनियंत्या परमेश्वराला संत तुकाराम महाराज संताच्या भेटीचे वर्म विचारतात हे प्रकाश महाराज साठे यांनी आपल्या कीर्तन सेवेत सविस्तर स्पष्ट केले. त्यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या विविध ओव्या आणि प्रमाण देऊन त्यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. आपल्या विनोदी शैलीतून चिंतन करत त्यांनी प्रसंगी चिमटे घेत उपस्थितांना आत्मपरीक्षण करायला लावले. उत्तम पिकासाठी जशी जमिनीची मशागत महत्त्वाची असते तसेच उत्तम संतती निर्माण होण्यासाठी संसार करताना देखील विचारपूर्वक वागावे लागते. जीवनामध्ये समर्पण महत्त्वाचे आहे. हरीकृपा झाली की संतांची भेट होत असते असे सांगून आपण परमार्थ करताना संतांची सेवा सुद्धा केली पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. आई वडील आपल्या घरातील देव आहेत, त्यांची भक्ती आणि सेवा करताना कुठे कसर राहू नये हे सांगताना आई आई असते आणि बाप बाप असतो, माय असते तेव्हा माहेरून येताना लेकीची पिशवी कुठल्या ना कुठल्या वस्तूने भरलेली असते पण माहेरी जेव्हा माय नसते तेव्हा लेकीच्या पिशवीत बदल झालेला असतो असे सांगताना उपस्थित भावी भक्त गहिवरून आले होते.

शिवाजीराव दादांचे कार्य महान

याप्रसंगी बोलताना प्रकाश महाराज साठे म्हणाले की, शिवाजीराव दादांनी राजकारण करताना परमार्थ सुद्धा साधला. भक्तीची सांगड घालून त्यांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले म्हणूनच त्यांचे अभिष्टचिंतन असा भक्तिमय सोहळा घेऊन केले जात आहे. गेवराई तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादाने दादांचे शताब्दी साजरी व्हावी असे सांगून जनतेची सेवा करणारा शिवछत्र परिवार आहे. दादांच्या संस्कारामुळे त्यांचे तीन पुत्र राजकारण , समाजकारण, उद्योग आणि सहकारी क्षेत्रात यशस्वी काम करत अशा भाषेत त्यांनी शिवछत्र परिवाराचे कौतुक केले.

*भक्तीसरगम कार्यक्रमाने*
*भाविक भक्त मंत्रमुग्ध*
==============
सायंकाळी संगीतरत्न बाळासाहेब वाईकर यांचा भक्ती सरगम कार्यक्रम चांगलाच बहरला त्यांनी सादर केलेले विविध अभंग रसिकांना मंत्रमुग्ध करून गेले. यावेळी त्यांना अरुण कदम यांनी संगीत साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे यांनी केले.

आजच्या सर्व कार्यक्रमांना जय भवानी कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित, जि.प.चे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यासह अभिष्टचिंतन सोहळा समितीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गेवराई शहरासह ग्रामीण भागातून आलेले भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

Beed : पुणे-नांदेड बस शेतात घुसली; जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवले

Next Post

बीड मतदारसंघात सुरळीत वीज वितरणासाठी आ.संदीप क्षीरसागरांचा पाठपुरावा

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
Next Post
बीड मतदारसंघात सुरळीत वीज वितरणासाठी आ.संदीप क्षीरसागरांचा पाठपुरावा

बीड मतदारसंघात सुरळीत वीज वितरणासाठी आ.संदीप क्षीरसागरांचा पाठपुरावा

दैवत मानलेल्या नारायण गडाच्या चरणी मनोज जरांगे पाटील नतमस्तक

दैवत मानलेल्या नारायण गडाच्या चरणी मनोज जरांगे पाटील नतमस्तक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी डॉ.योगेश क्षीरसागर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी डॉ.योगेश क्षीरसागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा