Beed : लोकशाही मार्गने आंदोलन करण्याचा प्रत्येक नागरिकांना अधिकार असून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील सराटी वडगाव येथे मराठा समाजाचे आंदोलन सुरू असतांना काल पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. हे बाब अत्यंत निंदनीय आहे. दरम्यान, या लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या जिल्हा बंदचा हक्क देण्यात आली असून या बंदला आमचा पाठिंबा असल्याचे बीड विधानसभेचे नेते बळीराम गवते यांनी म्हटले आहे.