तीन पिडीतांची सुटका; शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु
प्रारंभ वृत्तसेवा
Beed : शहरातील जालना रोड परिसरात गेल्या अनेक दिवसापासून स्पा पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता, याचीच माहिती आयपीएस पंकज कुमावत यांना मिळाल्यानंतर त्यांनी माजलगावच्या पोलीस उपाधीक्षक श्वेता खाडे यांना त्या ठिकाणी पाठवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतर श्वेता खाडे यांच्या टीमने या ठिकाणी येत एक डमी ग्राहक त्या ठिकाणी पाठवत खाञी पटल्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात तीन पिडीतांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून हि कारवाई आज रात्री नऊच्या दरम्यान करण्यात आले.
याबाबद अधिक अशी की, बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जालना रोडवर मोठ्या चौकातील एका शोरुमच्या पुढे जालणारोडवर इमारतीतमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती आयपीएस पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यानंतर कुमावत यांनी माजलगावच्या पोलिस उपअधिक्षक स्वेता खाडे यांना आपल्या पथकासह धाड टाकण्यासाठी पाठवले. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून खात्री केली. यानंतर धाड टाकली असता तीन पिडीतांची सुटका करण्यात आली. एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. याबबद अधिक असे की, बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जालना रोडवर मोठा चौकातील एका शोरुमच्या पुढे जालणारोडवर इमारतीतमध्ये स्पा सेटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती थेट आयपीएस पंकज कुमावत यांना मिळाली होती. त्यानंतर कुमात यांनी माजलगावच्या पोलिस उपअधिक्षक स्वेता खाडे यांना आपल्या पथकासह धाड टाकण्यासाठी पाठवले. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून खात्री केली. यानंतर धाड टाकली असता तीन पिडीतांची सुटका करण्यात आली. एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.