मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार
बीड प्रतिनिधी : मणिपूर राज्यामध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून प्रचंड हिंस्त्र वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचाराचे फोटो, विडीओ समाजमाध्यमांवर पसरले आहेत. या सर्व घटनांचा निषेध आ.संदीप क्षीरसागर यांनी नोंदविला आहे.
सध्या मणिपूर मध्ये भयंकर हिंसा सुरू आहे. पाठीमागेच येथील महिलांवर झालेल्या अतिशय हीन अत्याचाराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वत्र व्हायरल झाले आहेत. यामध्ये अतिशय बीभत्स प्रकार आहे. अशा घटना त्याठिकाणी तब्बल अडीच महिन्यांपासून सुरू असतांना यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी तेथील राज्यशासन व केंद्रशासन यांच्याकडून पाऊले उचलली गेली नाहीत. येथील होणार्या हिंसेचा बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. तरी आपल्या स्तरावरून मणिपूरमध्ये अस्तित्वात असलेले राज्य सरकार व केंद्र सरकार यांना याबाबत पत्रव्यवहार व्हावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.