शिवसेना कार्यालयातून घेण्यात आला तडका फडकी निर्णय
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : उद्धव ठाकरे यांच्या गटाचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या कला केंद्रावर टाकलेल्या छाप्यानंतर या ठिकाणी वेश्या व्यवसाय होत असल्याचं निदर्शनास आले होते. या प्रकरणी एकूण 36 जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले होते. या सर्व पार्श्वभूमीच्या अनुषंगाने शिवसेना कार्यालयाकडून रत्नाकर शिंदे यांची तडकाफडकी पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. या हकालपट्टीनंतर शिवसेनेचे नेत्या सुषमा अंधारे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.