प्रारंभ वृत्तसेवा
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज (ता. ०२) राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली परंतु त्यांनी घेतलेल्या निर्णयाला सर्वच नेत्यांनी विरोध केला परंतु शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयावर ते ठाम असून लवकरच राष्ट्रवादीची जबाबदारी नवीन नेतृत्वाला संधी देण्यात येईल असे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले. यावेळी अजित पवार यांनी पुढे सांगितले की, जो कोणी नविन अध्यक्ष होईल तो साहेबांच्याच मार्गदर्शानाखाली काम करेल असेही अजित पवार म्हणाले.परंतू सर्वच पदाधिकारी या निर्णयाला विरोध करत असून पवार साहेब पुढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.