“शिट्टी वालो तुम कितना भी माल बाटो.. लेकिन सिटी बजने वाले वाली नही है “–सुरेश धस
कडा येथील रेकॉर्ड ब्रेक सभेत कार्यकर्त्यांना आदेश दिल्यामुळे सुरेश धस यांचे विजयावर..” शिक्कामोर्तब”
आष्टी प्रतिनिधी : स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी 1999 ला सुरेश धस यांच्या हाती कमळ दिले होते.2017 मध्ये विधान परिषदेमध्ये भा.ज.प.उमेदवार म्हणून सुरेश धस यांना विजयी केले आता पुन्हा 2024 मध्ये सुरेश धस यांच्या हाती कमळ देत आहे.सदैव गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणाऱ्या सुरेश धस यांच्या मागे आपली ताकद उभी करा आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी केले.
आष्टी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना रिपाई (आठवले गट )आणि मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये त्या बोलत होत्या.
सभेच्या व्यासपीठावर माजी आमदार साहेबराव दरेकर, बीड जिल्हा भाजपा अध्यक्ष शंकर देशमुख, महाराष्ट्र राज्याचे अनुसूचित जाती मोर्च्याचे उपाध्यक्ष वाल्मीक निकाळजे, शिरूर तालुका भाजपाचे अध्यक्ष सुरेश उगलमुगले, आष्टीचे नगराध्यक्ष जिया बेग, नगराध्यक्ष रोहिदास गाडेकर,शिरूरचे माजी सभापती बाबुराव केदार, महाराष्ट्र राज्य भाजप युवा मोर्चाचे सचिव अभिजीत शेंडगे, समाजसेवक विजय गोल्हार, कडा मार्केट कमिटीचे सभापती रमजान तांबोळी, पाटोदा मार्केट कमिटीचे सभापती किरण शिंदे पाटील ,तात्याराव हुले पाटील, किरण बांगर, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, सुरेश धस हे उमेदवार अत्यंत कष्ट करणारे अनेक वर्ष काम करणारे जनतेचे प्रश्न माहीत असणारे व्यक्तिमत्व असून मी ग्रामीण विकास मंत्री असताना त्यांनी बीड जिल्हा परिषद भाजपाच्या ताब्यात दिली.त्यावेळी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे बेरजेचे राजकारण करत असतात मी सुरेश धस यांना सोबत घेऊन गुणाकार करण्याचे राजकारण केले बीड जिल्ह्यामध्ये चांगलं कष्ट करणार चांगलं नेतृत्व पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन कामाचं गणित मांडलं आणि जिल्हा परिषदे वर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी आणि आम्ही रक्ताचे पाणी, करून कमळ फुलवले आहे ते कमळ मुंडे साहेबांनी सुरेश धस यांचे हाती दिले. आणि मी आज परत ते सुरेश धस यांच्या हाती सुपूर्द करत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेच कमळ हाती घेऊन सलग तीन वेळा पंतप्रधान होण्याचा मान मिळवला असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे देखील हेच कमळ हाती घेऊन सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी राहिले या निवडणुकीमध्ये देखील महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीचे सरकार येणारच आहे.बीड जिल्ह्यात देखील भारतीय जनता पार्टीचे दोन्ही आमदार निवडून येणार आहेत आणि बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यात चांगले दिवस येणार आहेत असे वातावरण दिसून येत आहे संपूर्ण बीड जिल्ह्याची मनस्थिती चांगली आहे महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील
सुरेश धस हे गोरगरिबांना सतत मदत करणारे कष्ट करणारे शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत असणारे उमेदवार आहेत लोकांच्या दुःखावर फुंकर घालून त्यांच्या पाठीवर हात ठेवून बोलणारं हे व्यक्तिमत्व असून त्यांच्या एवढे कष्ट कोणीही घेऊ शकत नाही हे संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे. पुढे म्हणाल्या की,
आष्टी विधानसभा मतदारसंघांमध्ये स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि आमच्या राजकीय घराण्याला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे त्यामुळे आता सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन करून त्या म्हणाल्या की, माझी आणि सुरेश धस यांची शक्ती एकत्र येऊन राजकीय वज्रमुठ बांधली जाणार आहे त्यामुळे बीड जिल्ह्याला पुन्हा चांगले दिवस येतील ही निवडणूक महत्त्वाची आहे त्यामुळे धस यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहनही त्यांनी शेवटी केले .
आष्टी विधानसभेचे उमेदवार सुरेश धस यांनी या वेळी बोलताना महायुती शासनाचे कृषी विभागाचे अनेक निर्णय चांगले असून मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला फळबाग, फळबागेसाठी शंभर टक्के अनुदान ईतर पिकांसाठी 80 टक्के अनुदान 6.50 लक्ष रुपये किमतीचे शेततळे, गोपीनाथराव मुंडे अपघात विमा , शेतीसाठी बी बियाणे वाटप, सामूहिक कांदा चाळ ,व्यक्तिगत लाभाच्या विहिरी , या मनरेगाच्या योजनां मधून शेतकऱ्यांना मोठा फायदा झालेला आहे खुंटेफळ साठवण तलावाच्या सर्वेक्षणापासून पाईपलाईन पर्यंतची सर्व कामे माझ्या पत्रावर मंजूर झाले असून खुंटेफळ साठवण तलावा तील पाणी रोडागिरी डोंगरावरून मातकुळी पर्यंत पाणी जाणार असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलणार आहे या कामाचे श्रेय इतर कोणीही घेऊ शकत नाही सीना मेहेकरी योजनेचे देखील माझ्याच काळात 97 टक्के काम झाले होते या पुढील कामांमध्ये घरकुलाच्या सर्व योजनांमधील जास्तीत जास्त घरकुलांना मंजुरी देऊन गरजू लोकांना हक्काचे छत पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे
शिरूर आणि पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गोदावरी खोऱ्यातील पश्चिम वाहिनीचे 55 टीएमसी पाणी येणार असून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे असे सांगून आष्टी पाटोदा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस गाळप करण्यासाठी इतर कोणाच्याही दारात जावे लागणार नाही यासाठी आपल्या हक्काचा खासगी साखर कारखाना उभारणीसाठी काम सुरू असून लवकरच हा साखर कारखाना उभा राहणार आहे त्या ठिकाणी वीज निर्मिती आणि इथेनॉल निर्मिती देखील होणार असल्यामुळे शेतकऱ्यांची सोय आणि रोजगार देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत असे सांगत समोरील प्रतिस्पर्धी उमेदवार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे यांच्यावर घणाघात करताना ते म्हणाले की,महाविकास आघाडी सरकारच्या काळात धस कुटुंबीयांवर गुन्हे दाखल करा, त्यांना जेलमध्ये घाला, यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि असीम सरोदे सारख्या मोठ्या मानधनाच्या वकिलाला माझ्याविरुद्ध पत्रकार परिषद घ्यायला लावली परंतु त्यांनी हे पण सांगावे की दादेगाव येथील श्रीराम देवस्थानाची 700 एकर जमीन शिराळ मधील लोकांकडे असून त्यातली सर्वात जास्त 300 एकर जमीन आ. बाळासाहेब आजबे यांच्या कुटुंबाकडे आहे हे पण त्यांनी जनतेला सांगायला हवे होते.फॉर्म भरताना केलेल्या भाषणात ते म्हणाले की,
मी खोडावर घाव घालतो परंतु हे त्यांचे काम नाही ते खोडावर काय फांदीच्या पालाला देखील ते काहीच करू शकत नाहीत धस कुटुंबीयांचा नाद करायचा नाही
मागच्या निवडणुकीत तुम्ही कसे निवडून आलात ? हेच तुम्हाला माहिती नाही आता या निवडणुकीत 75 टक्के तुमचे मतदार निसटले असून राहिलेले 25 टक्के देखील संध्याकाळपर्यंत ते ही राहणार नाहीत
मी तुम्हाला मोकळा करून टाकतो असे सांगून ते म्हणाले राष्ट्रवादी पार्टीचा राज्यामध्ये सर्वात कमी मते मिळणारा उमेदवार म्हणून आ.आजबे या उमेदवाराची नोंद होईल हे मी जाहीर पणे सांगतो असा टोला लगावला
तर दुसरे प्रतिस्पर्धी असलेले माजी आमदार भीमराव धोंडे यांचे विषयी बोलताना ते म्हणाले की, मी तिसरी मध्ये असताना 1978 पासून ते प्रत्येक विधानसभा निवडणुकीत उभे राहत आहेत स्वतःच्या निवडणुकीत स्वतःचे चिन्ह विसरून ते दुसऱ्याचं फुका असं म्हणत आहेत त्यांच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले की, हा तुमचा शेवटचा त्रास असून यापुढे निवडणुकीचा तुम्हाला त्रास होणार नाही कारण त्यांचं राजकारण उरकणार आहे हे मी ठामपणे सांगतो असे सांगत “शिट्टी वालो तुम कितना भी माल बाटो.. लेकिन सिटी बजने वाले वाली नही है ” अशी मिश्कील टिपणी केली
यावेळी बोलताना माजी आमदार साहेबराव दरेकर म्हणाले की,
सुरेश धस हे माझे नातेवाईक आहेत म्हणून त्यांना मदत करत नसून ते धडाडीचे नेतृत्व आहे त्यांच्याच नेतृत्वाखाली आष्टी विधानसभा मतदारसंघाचा विकास होणार आहे हा माझा विश्वास असल्यामुळे मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे असे सांगितले.
या जाहीर सभेसाठी मतदार संघातील महिला भगिनीचे मोठ्या प्रमाणात आकर्षण होते तर नागरिकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. भाषण सुरू असताना देखील माणसांचा लोंढाच लोंढा सभेकडे येताना दिसत होता.
चौकट
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड थांबवणार साखर कारखाना उभारणार
— सुरेश धस
आष्टी,पाटोदा, तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस गाळप करण्यासाठी इतर कोणाच्याही दारात जावे लागणार नाही यासाठी आपल्या हक्काचा खासगी साखर कारखाना उभारणीसाठी काम सुरू असून लवकरच हा साखर कारखाना उभा राहणार आहे त्या ठिकाणी वीज निर्मिती आणि इथेनॉल निर्मिती देखील होणार असल्यामुळे शेतकऱ्यांची सोय आणि रोजगार देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत.यासाठी मला तुम्ही पुढचे पाच वर्ष काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती सुरेश धस यांनी केली.
क्षणचित्रे…
कडा शहरातील सांगता सभेला महिलांचा उत्साह आणि लक्षणीय उपस्थितीमुळे माझ्या लाडक्या बहिणी सोबत असल्याने माझा विजय निश्चित असल्याची भावना सुरेश धस यांनी व्यक्त केली.
सभेच्या सुरुवातीला कडा शहरातून सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्या उपस्थितीत महिलांची भव्य प्रचार फेरी संपन्न झाली ज्यामध्ये हजारो महिलांची उपस्थिती होती.
सभास्थळी गर्दीने उच्चांक प्रस्थापित केल्याने मंडप अपुरा पडला त्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल सुरेश धस यांनी उपस्थितांची दिलगिरी व्यक्त केली.
सभेला झालेल्या गर्दीने आष्टी – अहील्यानगर महामार्ग तब्बल दोन तास ट्रॅफिक मुळे जाम झाला होता.
जे कमळ आम्ही रक्ताचं पाणी करून गावा गावात पोहचवल आम्ही ज्यांना शब्द देतो ते खरे करून दाखवतो संशयाचं राजकारण करत नाही म्हणत पंकजाताईंनी विरोधकांना ठणकावलं.