• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, May 14, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड जिल्हा गेवराई

जातीपातीचे राजकारण सोडून विजयराजे यांना प्रचंड मताने निवडून द्या- ना. धनंजय मुंडे

Prarambh Team by Prarambh Team
November 18, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

उमापूर येथील सभेमध्ये विजयसिंह पंडित यांच्या विजयावर शिक्कामोर्तब

गेवराई  प्रतिनिधी :लोकसभेला झाले ते चुकीचे झाले. आम्ही कधी जातीपातीचे राजकारण केलेले नाही. जातीपातीच्या राजकारणामुळे येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य बरबाद होणार आहे. लोकसभेचा पराभव लक्षात ठेवून मतदान केले, तर आपले मत विभाजन होऊन याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. महाविकास आघाडीचा फायदा म्हणजे धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे, अमरसिंह पंडित या सर्वांचेच नुकसानच आहे तेव्हा जातीपातीचा आणि किंतू परंतु चा विचार न करता महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहन ना. धनंजय मुंडे यांनी केले. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ आयोजित उमापूर येथील सभेमध्ये बोलत होते.

यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आखाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सुरेश हात्ते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मूजीब पठाण, आरपीआय कवाडे गटाचे अनिल तुरूकमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गेवराई तालुका अध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, भाजपा तालुका अध्यक्ष प्रकाश सुरवसे, अशोक हिंगे, जेष्ठ नेते आप्पासाहेब औटी, महेश रावडे, श्रीकांत सानप, उद्धव खाडे, जालिंदर पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मी मुंडेची अवलाद आहे. मुंडेंची अवलाद अंधारामध्ये काही निर्णय घेत नाही. आम्ही जो निर्णय घेतो तो स्पष्ट असतो आणि आमचा निर्णय म्हणजे विजयराजे पंडित यांना आमदार करण्याचा आहे. यासाठी पंकजाताई मुंडे, मी व भैय्यासाहेब मिळून विजयराजे यांना आमदार करू. २००२ ला मी व भैय्यासाहेब जिल्हा परिषद सदस्य असताना असलेली मैत्री कायम आहे. मी त्यांना तेंव्हापासून ओळखतो. तालुक्याच्या विकासाचे स्वप्न ऊराशी बाळगुन हा माणूस अविरत कार्यरत आहे. आपल्या छोट्या भावाला आमदार करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करतोय. असे बंधुप्रेम विरळच असते. भैयासाहेब मी तुम्हाला शब्द देतो विजय राजे उद्याच्या 23 तारखेला आमदार असतील आणि गुलाल आपलाच असेल, उपस्थितांचे चेहरे पाहता विजयसिंह पंडित यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आखाडे म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारने विविध समाजासाठी महामंडळे सुरू करून वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. सुरू केलेल्या विविध योजना पुढील काळात चालू ठेवायच्या असतील तर महायुतीचे सरकार निवडून देणे आवश्यक आहे, यासाठी विजयसिंह पंडित यांना आशीर्वाद द्या.

यावेळी बोलताना अमरसिंह पंडित म्हणाले की, गेवराई विधानसभा मतदारसंघ पाणीदार करणे हे आमचे ध्येय आहे, त्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत, विरोधक मात्र केलेल्या कामावर न बोलता माझ्यावर व माझ्या परिवारावर टिका करत आहेत, आम्ही त्याला भिक घालत नाही. आम्हाला लोकांची साथ आहे. विजयसिंह पंडित यांना विजयी करून राज्याच्या सर्वोच्च पंचायतीमध्ये पाठवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी सभापती मुजीब पठाण अशोक हिंगे, आप्पासाहेब औटी यांनी मनोगत व्यक्त केले. या सभेला पंचक्रोशतील मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये झालेली ही जाहीर सभा या जाहीर सभेने विजयसिंह पंडित यांच्या प्रचाराची सांगता झाली. सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ना. धनंजय मुंडे यांच्या सभेने विजयसिंह पंडित यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे.

विजयसिंह पंडित यांना
गुरव महासंघाचा पाठींबा

महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा महासंघाचे अध्यक्ष राजेश गवळी, सचिव रंगनाथ मोकाशी यांनी केली.राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय महासंघाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. याप्रसंगी
प्रदीप गवळी, अमोल दायमा, राजेंद्र माने,
वैभव चिंचोलकर, राजू गावडे यांच्यासह राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous Post

विरोधकांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा केलेल्या कामावर बोलावे – विजयसिंह पंडित

Next Post

गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणाऱ्या सुरेश धस यांच्या मागे ताकद उभी करा – आ.पंकजाताई मुंडे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025
पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

May 2, 2025
जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

May 2, 2025
पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

April 24, 2025
विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

April 24, 2025
ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

April 23, 2025
शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

April 22, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

April 22, 2025
उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

April 22, 2025
Next Post
गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणाऱ्या सुरेश धस यांच्या मागे ताकद उभी करा – आ.पंकजाताई मुंडे

गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणाऱ्या सुरेश धस यांच्या मागे ताकद उभी करा - आ.पंकजाताई मुंडे

मला विजयी करा व आपली सेवा करण्याची संधी द्या

मला विजयी करा व आपली सेवा करण्याची संधी द्या

परळी विधानसभा लढवत असलेल्या सर्व प्रमुख उमेदवारांना पोलीस संरक्षण द्या – धनंजय मुंडेंचे एसपी बारगळ यांना पत्र

परळी विधानसभा लढवत असलेल्या सर्व प्रमुख उमेदवारांना पोलीस संरक्षण द्या - धनंजय मुंडेंचे एसपी बारगळ यांना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा