बीड (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे बीड विधानसभेचे उमेदवार आ. संदीप क्षीरसागर यांनी प्रचाराच्या अंतिम दिवशी बीड येथे जिल्हा वकील संघासोबत बैठक घेतली. या निवडणुकीत आशीर्वाद देत सहकार्य करण्याचे आवाहन त्यांना केले.
सोमवारी दुपारी बीड येथे जिल्हा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आ. संदीप क्षीरसागर यांनी संवाद साधला. अतिशय खेळीमेळीच्या या बैठकीत आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद येणाऱ्या २० तारखेला “तुतारी वाजवणारा माणूस ” या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करून पुन्हा विधानभावनात काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन केले.यावेळी वकील संघाचे मान्यवर पदाधिकारी व सर्व सदस्य उपस्थित होते.