ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या बीड पदाधिकाऱ्यांनी दिला बिनशर्त पाठिंबा
बीड प्रतिनिधी : ऑल इंडिया मुस्लीम ओ.बी.सी. ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहेमद अन्सारी साहेब यांच्या आदेशावरून ऑल इंडिया मुस्लीम ओ.बी.सी. ऑर्गनायझेशन बीड यांनी, बीड विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्ष, महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार आ. संदीप क्षीरसागर यांना बिनशर्त पाठिंबा दिला. दरम्यान बीड मतदार संघात आमदार संदीप भैया यांना वाढता पाठिंबा आणि पाठबळ मिळत असल्याने त्यांचा विजय अधिक सुकर झाला आहे.सर्वांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष हाजी शेख जाकेर महेबुब, मणियार, मोमीन अब्दुल शाके, मोमीन खालिद अब्दुल राउफ, सय्यद फिरोज अली, तांबोळी शफिक, हाजी नसोमोदीन इनामदार, सलाम अब्दुल गफूर शेठ, कुरेशी इरफान अहमद बशीर, शेख ताहेर जाफर, खुर्शीद आलम, शेख वजीर चांद अत्तार, हाजी इकबाल कुरेशी, बागवान जलीम वजीर, शेख मोहसीन वजीर, शेख ताहेर शेख वाहेद, अब्दुल रहीम, ख्वाजा मिया शेख व इतर मान्यवरांनी मला जाहीर पाठिंबा दिला. आ. संदीप भैय्यांनी या सर्व मान्यवरांचे आभार मानते येणाऱ्या २० तारखेला मतदान करताना अनुक्रमांक ३, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.