चारशे गाड्यांचा ताफा घेऊन हजारो कार्यकर्त्यांसह अनिलदादा जगताप बीड मतदार संघातील देवस्थानी नतमस्तक
अनिलदादा जगताप, प्रा सुरेश नवलेंचे बीड मतदार संघात सर्वत्र जोरदार स्वागत
बीड, प्रतिनिधी- गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय प्रवासात निःस्वार्थपणे बीडवासियांची सेवा करत आलेले अनिलदादा जगताप हे केवळ बीड विधानसभेचे अपक्ष उमेदवार नसून अनिलदादा हा बीडवासियांचा झंजावत आहे आणि याच झंजावाताला प्रारंभ झाला असून अनिलदादा जगताप यांनी माजी राज्यमंत्री प्रा. सुरेशजी नवले आणि आपल्या हजारो सहकारी कार्यकर्ते समर्थक मित्र परिवाराच्या चारशे गाड्यांचा ताफा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले व त्यानंतर नवगण राजुरी येथे गणपतीचे दर्शन घेऊन श्री क्षेत्र नारायण गड येथे श्री नगद नारायणाचे आशीर्वाद घेत त्यांच्या चरणी प्रचाराचा नारळ फोडला आणि आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यानंतर बीड मतदार संघातील राजुरी सर्कल, लिंबागणेश सर्कल, पाली सर्कल, खोकरमोहा जि प, नळावंडी सर्कलमधील गावागावातील देवस्थानाचे दर्शन घेतले. दरम्यान गावाखेड्यातील प्रत्येकाने अनिलदादा आणि सुरेश नवले यांचे गावात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करत अनिलदादांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले तर माता-माऊली आणि भगिनींनी अनिलदादा यांचे औक्षण करून त्यांना पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले. यानंतर अनिलदादांनी गौरक्षनाथ टेकडी या देवस्थानी नतमस्तक होऊन महंत नवनाथ महाराजांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर बीड शहरातील भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर, बस्वेश्वर स्वामी, संत गाडगे बाबा महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महाराणा प्रताप, माता जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन केले. याप्रसंगी अनिलदादा जगताप आणि प्रा सुरेशजी नवले यांनी ठिकठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या, ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या व विधानसभा निवडणुकीत आम्हाला मतदान रुपी आशीर्वाद द्या असे आवाहन केले.
—-
*चौकट*
*क्षीरसागर मुक्त बीड करून विकासाचा कायापालट करण्यासाठी साथ द्या-अनिलदादा जगताप*
अनेक वर्ष सत्ता भोगून बीड विकासाचा खेळखंडोबा करणाऱ्या क्षीरसागरांपासून मला बीडची सुटका करायची आहे आणि बीड विकासाचा कायापालाट करायचा आहे. यासाठी माझ्यावर एकदा विश्वास ठेऊन मला साथ द्या. आपल्या अपेक्षेप्रमाणे मी बीडचा विकास करून दाखवेल. आपण मला मतदानरुपी आशीर्वाद दिला तर घरणेशाहीचे मक्तेदारी संपुष्टात येईल आणि सामान्य घरात सत्ता स्थापित होऊन सामान्यांचे मूलभूत प्रश्न सुटतील. असे आवाहन बीड विधानसभेचे अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांनी बीड मतदार संघातील जनतेला केले.