राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांची एसपींकडे मागणी
Beed : शहरातील विविध भागात गत आठ दिवसांपासून चोरी, घरफोडीचे सत्र सुरू आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने ठोस कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे शनिवारी (दि.२९) केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, शहरात विविध भागात दररोज चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अक्षरशः नागरीक स्वतः आपापल्या भागामध्ये गस्त घालत आहेत. याकडे लक्ष घालून चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात कार्यवाही करावी. आतापर्यंत नोंद झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास गतीने करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच, शहरात पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केली आहे. दरम्यान, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे.