माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बीड
बीड – बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे गणपतीला हार घालून इंडिया आघाडीचे उमेदवार मा. बजरंग बप्पा सोनवणे यांचा डफड वाजवून डोर टु डोर प्रचार करण्यात आला येथील नागरिकांना इलेक्शन फक्त इलेक्शन नसून संविधान वाचवण्याची जबाबदारी आहे या देशांमध्ये भारतीय जनता पार्टीने माणूस माणसांमध्ये ठेवला नाही जाती जातीमध्ये धर्माधर्मांमध्ये घराघरांमध्ये भांडण लावण्याचे काम केलं आहे याला आवर घालण्यासाठी येणाऱ्या 13 तारखेला इंडिया आघाडीचे उमेदवार मा .बजरंग बप्पा सोनवणे यांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती मत करून प्रचंड मताने निवडून द्या असे सर्व नागरिकांना ठामपणे आम आदमी पार्टीच्या वतीने सांगण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे जिल्हा सचिव रामधन जमले जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सोनवणे तालुका अध्यक्ष भीमराव कुठे तालुका संघटन मंत्री दत्ता सुरवसे युवक संघटन मंत्री प्रवीण पवार पिंपळनेर सर्कल प्रमुख आसाराम नरवडे गव्हाणे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते