बीड प्रतिनिधी : बीड लोकसभा प्रचाराचा तिसरा म्हणजे अंतिम टप्पा चालू असून यामध्ये विविध प्रकारे आयडिया करून आपले चिन्ह घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोकराव हिंगे पाटील यांनी एलईडी व्हॅन कलापथकच्या माध्यमातून हायटेक प्रचार करत घराघरात जनतेच्या मनामनात गॅस सिलेंडर पोहोचवले आहे.
बीड लोकसभा मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचाराचा अंतिम टप्पा चालू असून प्रचाराचे रणधुमाळी जोरात चालू आहे विविध प्रकारे डोकेलिटी लढवत आयडियल आणि हायटेक प्रचार करून आपली चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम उमेदवार करत असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी गेवराई आणि बीड येथे अडकत प्रकाश आंबेडकर यांच्या सभांचे आयोजन करून मतदारांचे मन परिवर्तन मत परिवर्तन करण्याचे नियोजन आखले आहे तर एलईडी व्हॅनच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी केलेले कार्य तसेच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी वंचित दिन दलित दुबळे यांच्यासाठी केलेले कार्य या सर्व गोष्टीवर प्रकाश टाकणारे चित्रफीत एलईडी व्हॅनच्या माध्यमातून गावागावातील मतदारांना दाखवली जाते कला पथकाच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर हे दिन दलित दुबळ्याचे नेते आहेत हे गीतांच्या माध्यमातून जनतेसमोर सादर करत हायटेक प्रचार करून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांनी प्रचाराचा आघाडी घेतली आहे वंचित बहुजन आघाडीचे चिन्ह गॅस सिलेंडर घराघरात पोहोचते केले आहे गाव, वाडी,वस्ती, तांडा, शहरात, वंचित बहुजन आघाडीचे गॅस सिलेंडर पोहोचवले आहे त्यामुळे मतदारातही उत्साह वाढला आहे नको महायुती, नको महाविकास आघाडी आता हवी वंचितांची वंचित बहुजन आघाडी असा सूर गाव, खेडे, शहरातील मतदारा मधून निघत आहे त्यामुळे वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे.