बजरंग सोनवणेंच्या प्रचारार्थ रमेश गालफाडेंच्या पाटोदा तालुक्यात भेटीगाठी
Beed : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व इंडिया आघाडीचे बीड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार बजरंग मनोहर सोनवणे यांच्या प्रचारार्थ बहुजन विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेशतात्या गालफाडे यांनी पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथे ग्रामस्थांशी चाय पे चर्चा करत संवाद साधला. त्याचबरोबर घुमरा पारगाव येथे कॉर्नर बैठक घेऊन सर्व सामान्य नागरिकांसह बळीराजाने शेतकरी पुत्र बजरंग सोनवणेंना निवडून द्यावे. असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी रमेशतात्या गालफाडे म्हणाले की, राज्यातील राजकारणाची खालावलेल्या स्थितीमुळे सर्व सामन्यांचे प्रश्न मार्गी लागत नसून महागाईने जनता त्रस्त झाली असून शेतकरी विरोधी धोरणामुळे येथील बळीराजा देशोधडीला लागला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसह बळीराजाने शेतकरी पुत्र असलेल्या बजरंग बप्पा सोनवणे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्यासाठी तुतारी समोरील बटन दाबावे असे आवाहन रमेशतात्या गालफाडे यांनी केले.
दरम्यान, ज्ञानराधा बँकेतील आपल्या कष्टाचा पैसा मिळत नसल्याने चिंताग्रस्त झालेले नामदेव गाडे यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे बहुजन विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रमेशतात्या गालफाडे यांनी सांत्वनपर भेट देऊन गाडे कुटूंबियांचे सांत्वन केले. तसेच ज्ञानराधा बँकेततील पैसे नामदेव गाडे यांच्या परिवाराला कसे मिळतील यासाठी बहुजन विकास परिषद प्रयत्न करेल असा विश्वास रमेशतात्या गालफाडे गाडे कुटूंबियांना दिला. यावेळी बहुजन विकास परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.