प्रारंभ वृत्तसेवा
बीड : धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौसाळा परिसरामध्ये एका स्कॉर्पिओ गाडीत मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक विश्वजीत देशमुख यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली होती. या अनुषंगाने त्यांनी त्यांची टीम पाठवून खात्री केली, असता गाडीमध्ये तब्बल साडेचार लाखाची अवैध दारूचा साठा मिळून आला. या कारवाईत एकूण दहा ते साडेदहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक विश्वजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने केले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक श्री विश्वजित देशमुख गुप्त खबरीने माहिती दिली असता त्याअनुषंगाने आज (ता. ११) बीड सोलापूर हायवे वरील चौसाळा परिसरात महिंद्रा स्कॉर्पिओ (एम एच ४२ के ३६३५) या वाहनाची म झडती घेतली असता यात गोवा राज्य बनावटीचा व महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीस प्रतिबंधित असलेले विदेशी मद्य मिळून आले. सदरील ठिकाणी अनुक्रमे १)७० X २००० मिलीच्या गोवा राज्य निर्मितीच्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या सीलबंद बाटल्या ज्याची अं.किं.रु. १२९५००/- २) १० X २००० मिलीच्या गोवा राज्य निर्मितीच्या इम्पेरिअल ब्ल्यू व्हिस्कीच्या सीलबंद बाटल्या ज्याची अं.किं.रु. १५५००/- ३)४८५ X ७५० मिलीच्या गोवा राज्य निर्मितीच्या ऑफिसर चॉईस व्हिस्कीच्या सीलबंद बाटल्या ज्याची अं.कि.रु.२९१०००/- ४) एक जुनी वापराची महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ जिचा नोंदणी क्र. एम एच ४२ के ३६३५ ज्याची अं.किं.रु.६०००००/- असा एकूण १०३६०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.व सदरील गुन्ह्यातील आरोपी सुरेश उत्तम गोपाळघरे व इतर यांचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर कार्यवाहीत पोलीस निरीक्षच अभय औटे, आर.बी.राठोड निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गणेश गुरव निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई. व्ही. डी. आगळे उप निरीक्षक, रशीद बागवान उप निरीक्षक, अनंता नायाबळ उप निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सादिक सय्यद स.दु.नि.जवान सर्व श्री बी.के.पाटील, एस.व्ही. धस, एस.ए. सांगुळे, नितीन मोरे, राम गोणारे, प्रशांत मस्के, रूपसिंग जारवाल,कैलास जारवाल, शहाजी लोमटे, सुशील ढोले, के.एन. डुकरे यांनी उपरोक्त कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री विजयकुमार आगळे उप निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक बीड हे करत आहेत.