लवकर शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख म्हणून अनिल जगताप यांची निवड
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गेल्या चार वर्षापासून बीड मतदार संघामध्ये कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदार संघातील मतदारांच्या अडीअडचणी जाणून त्या मार्गी लावण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यावर नेहमीच शिवसेना (उबाठा) पक्षाकडून अन्याय झाल्याचे मत आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनिल जगताप यांनी व्यक्त केले. यानंतर नऊ तारखेला मुंबई येथील वर्ष बंगल्यावर असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी अनिल जगताप यांनी दिली. पञकार परिषदेनंतर बीड मतदार संघात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड मतदार संघात विजयी होणारा उमेदवार निवडल्याची चर्चा सुद्धा होऊ लागली आहे. यासह लवकरच बीड मतदार संघाचे जिल्हाप्रमुख म्हणून सुद्धा अनिल जगताप यांची निवड होणार असल्याचे विश्वसनीय माहिती मिळत आहे.