शिवसेनेला (उबाठा) ठोकला रामराम; शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करणार!
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : पक्षाकडून अन्याय झाल्यानंतर अनिल जगताप काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, अखेर अनिल जगताप यांनी त्यांची भुमिका स्पष्ट करत शिवसेनेला (उबाठा) रामराम ठोकत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवशे करण्याचा निर्णय घेतला. दादांच्या या निर्णयाचे स्वागत कार्यकर्त्यांनी करत दादांच्या निर्णयासोबत राहण्याचा निर्णय घेतला. पक्षानै सतत अन्याय केला, तरी आम्ही संयम ठेवत काम केले. विधानसभा जवळ आली की माझ्यावर अन्याय होतो असे मत अनिल जगताप यांनी व्यक्त केले. येणार्या ९ तारखेला २०२४ आठ वाजता शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करणार असल्याची दादांनी घोषणा केली.
माजी जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांना जिल्हा प्रमुख पदावरुन बाजूला करत इतरांना संधी दिली होती. यानंतर दादा वेगळा निर्णय घेतली अशी चर्चा सुरु होती. परंतू दादांनी त्यावेळेस संयम घेत भूमिका स्पष्ट केली नव्हती. अखेर आज दादांनी पञकार परिषद घेत शिवसेनेला (उबाठा) रामराम ठोकल्याची घोषणा केली. यासह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याची घोषणा सुद्धा यावेळी केली. तसेच यावेळी संपर्क प्रमुखांवर दादांनी निशाणा साधला. तसेच अंधाराचै नाव घेत सुषमा अंधारेवर निशाणा साधला.