बीड, प्रतिनिधी -जिल्ह्याभरातून विविध तालुक्यातून अठरा पगड जातीचा युवा वर्ग बीड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप यांच्या पाठीशी उभारत असून जिल्ह्याभरात पुन्हा एकदा नव्या जोमाने, उत्साहाने शिवसेना उबाठा बळकट सशक्त होताना दिसून येत आहे. मातोश्री मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बीड तथा उपसरपंच आंबेसावळी धनंजय गुंदेकर आणि सामाजिक कार्यकर्ते अजय सुरवसे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी बीड शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना उबाठा गटाला जिल्ह्यात नवी उभारी देण्यासाठी बीड शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप ताकदीनीशी कामाला लागले आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून शिवसेनेची ताकद वाढवून जिल्ह्याभरात पक्षाला बळकटी देण्यासाठी अनिलदादा जगताप यांनी जिल्हाभरात कार्यकर्त्यांची मोट बांधायला सुरु केले आहे. अनिलदादांची शिवसेनेवर 37 वर्षांपासून असलेली निष्ठा आणि आजवरची कार्यपद्धती पाहून तरुणाई मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असल्याचे दिसून येत आहे.
दिवसा पाठोपाठ शिवसेनेबरोबर जुळूत असलेली तरुणाई शिवसेनेच्या उद्याच्या विजयाची पायाभरणी ठरणार असल्याचे मत याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी व्यक्त केले. दरम्यान शिवसेनेत प्रवेश केलेल्या धनंजय गुंदेकर, अजय सुरवसे या तरुणांनी शिवबंधन बांधल्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेब
अनिलदादा जगताप यांचे आभार मानले. याप्रसंगी अनिलदादा जगताप यांच्याबरोबर बीड शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.