प्रारंभ वृत्तसेवा
बीड : गेल्या अनेक दिवसापासून युवा नेते योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या, या अनुषंगाने युवा नेते योगेश क्षीरसागर यांनी अजितदादा यांची भेट सुद्धा घेतली होती, परंतु याला मुहूर्त मिळत नव्हतं. अखेर त्याला मुहूर्त मिळाले असून बीडमध्ये 27 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभेमध्ये योगेश क्षीरसागर प्रवेश करणार असल्याचे जवळपास फायनल झाले आहे. त्यांच्यासोबत त्याचे अनेक कार्यकर्ते त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दर्शनात आहेत. परंतु या प्रवेशाला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे मात्र उपस्थित राहणार नसून त्यांची भूमिका मात्र अजून तरी समजू शकली नाही. (प्रवेश २७ झालाच नाही तर सप्टेंबर मध्ये होणार्या शासन आपल्यादारी या कार्यक्रमात होईल, पण प्रवेस होईल.)