बीड प्रतिनिधी : मोदी @9 महाजनसंपर्क अभियान अंतर्गत बीड जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड शहरातील व्यापार्यांचे संमेलन आज सायंकाळी 05.00 वा. मॉं वैष्णो पॅलेस येथे आयोजित केले आहे. या संमेलनास व्यापारी बांधवांनी सहभागी व्हावे. असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत देशाचा विकास गतिमान करून देशाचा स्वाभिमान गौरवांकित केला. मोदी सरकारची कामगिरी आणि कर्तुत्व विविध घटकातील प्रबुद्ध नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी आज हे व्यापारी संमेलन आयोजित केले आहे.
या संमेलनाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. राजेंद्र मस्के, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. सर्जेराव तांदळे, प्रा. देविदास नागरगोजे, मार्केट कमिटी संचालक शरद झोडगे, नितीन फड, चंद्रकांत फड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव पठाण,विठ्ठल ढोकणे यांच्या उपस्थितीत कृषी उतपन्न बाजार समिती बीड सभागृहात व्यापाऱ्यांची बैठक संपन्न झाली.