बीड प्रतिनिधी – संपूर्ण जगाला शांततेची आणि एकात्मतेची शिकवण देणार्या आषाढी सोहळ्याचे प्रस्थान होत असताना आळंदीत वारकर्यांवर निर्दयी पोलिसांनी केलेला लाठीचार्ज दुर्देवी आणि वेदनादायी आहे. तहान, भूक विसरून जगाच्या कल्याणासाठी पायी निघालेल्या वारकर्यांवर लाठीचार्ज होत असेल तर हेच मिंदे गटाचे हिंदुत्व आहे का? असा सवाल उपस्थित करून मिंदे गटाचे हिंदुत्वही फेक असल्याचा घणाघात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केला आहे.
गेल्या साडेतिनशे वर्षात जे घडले नाही ते काल आळंदीत पाहण्यास मिळाले. माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत असताना माऊलींच्या दर्शनासाठी वारकरी एकत्र जमले असताना पोलिसांनी वारकर्यांवर केलेला लाठीचार्ज वेदनादायी आहे. जगाला समतेची शिकवण देणार्या वारकरी संप्रदायाचा वारी सोहळा भक्तीचे अनोखे दर्शन दर्शवते. साडेतिनशे वर्षामध्ये वारकर्यांवर कधी असा लाठीचार्ज झाला नाही. इंग्रज आणि निजामाच्या काळातही ही वारी अविरत आणि शांततेत सुरू असताना काल आळंदीमध्ये पोलिसांनी आतेतायीपणा करत आपल्या पांडुरंगाचा धावा करणार्या वारकर्यांवर अमानुष लाठीचार्ज केला. िंमदे सरकारच्या राज्यात असेच चालू आहे. एकीकडे दरोडे पडत आहेत, बँका लुटल्या जात आहेत. महिला असुरक्षित आहेत. गुंडगिरी वाढली आहे. गुंड मोकाट फिरत आहेत. आणि वारकर्यांवर लाठीचार्ज केला जात आहे. हेच मिंदे सरकारचे हिंदुत्व आहे असा घणाघात शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केला.